Monday, April 29, 2024
Homeनाशिकआश्रमशाळा अल्पवयीन अत्याचार प्रकरण : महिला व बालविकासमंत्र्यांनी दिले 'हे' महत्वाचे ...

आश्रमशाळा अल्पवयीन अत्याचार प्रकरण : महिला व बालविकासमंत्र्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

मुंबई| Mumbai

शहरातील म्हसरूळ परिसरात (Mhasrul Area) एका आश्रमशाळेत सहा मुलींवर झालेल्या अत्याचाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी सखोल चौकशी (inquiry) करण्याचे निर्देश दिले आहेत…

- Advertisement -

याबाबत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांनी ट्विट केले असून त्यात म्हटले आहे की, नाशिक येथील अनाथ आश्रमाच्या संचालकाने आश्रमातील ६ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते. त्यानुसार या प्रकरणाची राज्य सरकारने (State Government) गंभीरतेने दखल घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमून ७ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलिसांनी (Police) आश्रमातील अन्य १५ मुलींचा (Girls) जबाब नोंदवला होता. त्यातील चार मुलींच्या जबाबातून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. तसेच या पिडीत सहा मुलींपैकी पाच मुली अल्पवयीन असून एका मुलीवर ग्रामीण भागात तर पाच मुलींवर आश्रमात अत्याचार करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आश्रम संचालक हर्षल मोरेला (Harshal More) अटक (Arrested) केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या