सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना गैरव्यवहार प्रकरणी मंत्री हसन मुश्रीफांसह कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

कोल्हापूरच्या (Kolhapur) सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील आर्थिक अफरातफर प्रकरणात विद्यमान कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ (Minister Hasan Mushrif) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. प्रथमदर्शनी हसन मुश्रीफ व त्यांच्या मुलांनी गुन्हेगारी कारस्थान रचून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे सरळसरळ स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवत विशेष पीएमएलए न्यायालयाने (PMLA Court) हसन मुश्रीफ यांचे ऑडिटर महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुश्रीफ कुटुंबीय पुन्हा मोठ्या अडचणीत सापडले आहे….

साखर कारखान्यातील आर्थिक अफरातफर प्रकरणात (Financial Scam Case in Sugar Factory) ईडीने (ED) मार्च महिन्यात मुश्रीफ कुटुंबियांच्या मालमत्तांवर छापेमारी (Raid) केली होती. तसेच अटकेच्या कारवाईसाठीही जोरदार हालचाल सुरु केली होती. त्यामुळे धास्तावलेल्या हसन मुश्रीफ व त्यांच्या तीन मुलांसह ऑडिटर महेश गुरव यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. महेश गुरव यांच्या अर्जावर राखून ठेवलेला निर्णय विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी  जाहीर केला.

यावेळी न्यायाधीश देशपांडे यांनी मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या साथीदारांनी केलेल्या गुन्हेगारी कारस्थान रचून गोळा केलेल्या पैशांची गुरव यांना चांगलीच कल्पना होती. त्यांनी तपासकर्त्या ईडीला दिलेली उत्तरे बारकाईने विचारात घेतल्यानंतर मुश्रीफ व त्यांच्या मुलांचे गुन्हेगारी कारस्थान स्पष्ट होते, असे निरीक्षण २४ पानी आदेशात नमूद केले आहे.

मंत्री हसन मुश्रीफ व त्यांच्या कुटुंबीयांनी शेतकऱ्यांना सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात (Senapati Santaji Ghorpade Sugar Factory) शेअर्स देण्याचे प्रलोभन दाखवले आणि शेतकऱ्यांकडून जवळपास ३८ कोटी रुपये गोळा केले. प्रत्यक्षात ही रक्कम मुश्रीफ यांच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये वळती केल्याचा आरोप ईडीने केला आहे. गुरव हा २०११ ते २०१६ दरम्यान कारखान्याचा ऑडिटर होता. त्यामुळे ईडीने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, महेश गुरव हे मुश्रीफांचे ऑडिटरच असल्याने अटकपूर्व जामीनाच्या प्रतिक्षेत असलेल्या मुश्रीफांच्या तिन्ही मुलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर विद्यमान मंत्री हसन मुश्रीफांची अटकपूर्व जामीन याचिका सध्या हायकोर्टात प्रलंबित असल्याने तूर्तास अटकेपासून दिलासा आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *