Thursday, April 25, 2024
Homeनगरओबीसींना हक्क मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार - ना. वडेट्टीवार

ओबीसींना हक्क मिळेपर्यंत लढा सुरू ठेवणार – ना. वडेट्टीवार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात करोना (Covid 19) आणि पूरपरिस्थितीमुळे (Flood situation) जनतेला तातडीने मदत पुरवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे. बाधितांना मदतीचा हात देऊन त्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. ओबीसी (OBC) प्रश्नांसंदर्भातही वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण (Political reservation of OBC) पूर्ववत होत आहे. ओबीसींना जोपर्यंत त्यांचे हक्क मिळणार नाही, तो पर्यंत हा लढा असाच सुरू राहील. राज्य सरकार ओबीसींच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मदत व पुनवर्सन मंत्री ना.विजय वडेट्टीवार (Minister for Relief and Rehabilitation Vijay wadettiwar) यांनी केले.

- Advertisement -

मंत्री विजय वडेट्टीवार (Minister for Relief and Rehabilitation Vijay Wadettiwar) नगरमध्ये आले असता विष्णू फुलसौंदर व अवधुत फुलसौंदर यांनी त्यांचे स्वागत केले केले. याप्रसंगी विक्रम राठोड, अमोल जाधव, बाळासाहेब भुजबळ, डॉ.सुदर्शन गोरे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्री वडेट्टीवार (Minister for Relief and Rehabilitation Vijay Wadettiwar) म्हणाले, नगरमध्ये ओबीसी संघटनेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने या लढ्यास यशही येत आहे. याप्रसंगी फुलसौंदर यांनी नक्षत्र ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. करोना काळातही कोविड सेंटर सुरू करून रुग्णांची सोय केली होती, असे सांगून व्यवसाय करताना सामाजिकतेचे भान ठेवून गरजुंना नेहमीच मदतीचा हात देत असल्याची माहिती मंत्र्यांना दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या