Friday, April 26, 2024
Homeनगरनगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नगर दौरा रद्द

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नगर दौरा रद्द

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारचा नगर दौरा रद्द झाला आहे. भाईंचा दौरा रद्द झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा निश्वास सोडला.

- Advertisement -

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी (दि.22) नगर दौरा नियोजीत होता. तसा मेसेज कलेक्टर ऑफिसला मंगळवारीच मिळाला होता. आज सकाळी त्यांना नगर दौरा रद्द झाल्याचे फोनद्वारे स्वीय सहाय्यकांनी जिल्हा प्रशासनाला कळविले.

सकाळी दहा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत मंत्री शिंदे यांच्या बैठकांचा सीलसीला होता. महापालिकेत पहिली त्यानंतर कलेक्टर ऑफिसला त्यांची नगरविकास नियंत्रण नियमावलीसंदर्भात बैठक होणार होती. नियमावलीची अंमलबजावणी आणि त्या अनुषंगाने इतर बाबींचा मंत्री शिंदे हे आढावा घेणार होते.

शिंदे आणि नगरचं वेगळं नातं

मंत्री शिंदे आणि अहमदनगरचे नाते वेगळे आहे. नगर मंहापालिकेत ज्या-ज्यावेळी शिवसेनेची सत्ता आली त्या-त्यावेळी पक्ष नेतृत्वाने ती जबाबदारी मंत्री शिंदे यांच्याकडे दिली होती. शिंदेकडे जबाबदारी दिल्यास नगरला शिवसेनेचा महपौर होतोच असा आजपर्यंतचा शिवसैनिकांचा अनुभव आहे. आताही चार महिन्यावर नव्या महापौर पदाची निवडणूक आली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या दौर्‍यात आगामी महापौर निवडणुकीबाबत चर्चा होणार हे निश्चित होते, पण शिंदे यांचा दौरच रद्द झाल्याने शिवसैनिकांमध्येही नाराजीची भावना दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या