Thursday, April 25, 2024
Homeनगरकार्यकर्त्यांच्या आनंदात आपणही सहभागी झाले पाहिजे

कार्यकर्त्यांच्या आनंदात आपणही सहभागी झाले पाहिजे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीचे महायुतीचे सरकार आलेले आहे. साहजिकच या तिन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो कार्यकर्त्यांनी फ्लेक्सवर लावलेले आहेत. जर कार्यकर्त्यांना त्यात आनंद मिळत असेल तर आपणही त्यांच्या आनंदात सहभागी झाले पाहिजे, अशी पुष्टी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. परळीत कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर स्व.गोपिनाथ मुंडे, शरद पवार आणि पंकजा मुंडे यांच्या एकत्र फोटोवर धनंजय मुंडे बोलत होते.

- Advertisement -

अजित पवार सत्तेत सहभागी होत असताना सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्या नंतर मंत्री झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जंगी स्वागत त्यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी धनंजय मुंडे परळी मतदारसंघात जात असतांना नगरला थांबले होते. यावेळी त्यांना मुंडे परळीत कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताचे फ्लेक्स लावले आहेत. विशेष या फ्लेक्सवर स्व.गोपीनाथ मुंडे, स्व.पंडित आण्णा मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचेही फोटो झळकवले आहेत.

याबाबत धनंजय मुंडे यांना विचारले असता त्यांनी, नुकतेच राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीचे महायुतीचेसरकार आलेले आहेत. साहजिकच या तिन्ही पक्षाच्या जेष्ठ नेत्यांचे फोटो कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. जर कार्यकर्त्यांना त्यात आनंद मिळत असेल तर आपणही त्यांच्या आनंदात सहभागी झाले पाहिजे अशी पृष्ठी धनंजय मुंडे यांनी केली.

तसेच माझ्या बॅनरवर यापूर्वीही स्व.गोपीनाथ मुंडे यांचे अनेकदा फोटो कार्यकर्त्यांनी लावलेले आहेत. मात्र त्यावेळी माध्यमांनी कधी विचारले नाही, आज मात्र विचारले अशी टिप्पणी धनंजय मुंडे यांनी केली. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर मला याबाबत काही माहिती नसून याबद्दलची माहिती मुंबईतूनच मिळेल असे सांगत याबाबत अधिक बोलणे टाळले.

- Advertisment -

ताज्या बातम्या