Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामंत्री छगन भुजबळांचे येवल्यात जल्लोषात स्वागत

मंत्री छगन भुजबळांचे येवल्यात जल्लोषात स्वागत

नविन नाशिक | प्रतिनिधी

अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्याच्या मंत्री मंडळात शपथ घेतल्यानंतर ना.छगन भुजबळ (Chagan Bhujbal) हे आज येवला (Tour Of Yeola) दौऱ्यावर आहे. आज नाशिक विमानतळावर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच जानोरी येथील स्थानिक नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रीमंडळात अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खाते मिळाले आहे. यानंतर पहिली प्रतिक्रिया देत त्यांनी आनंद व्यक्त केला.

मोठी बातमी! महायुतीचे खातेवाटप जाहीर; भुसेंना बढती, भुजबळांना मिळालं ‘हे’ खातं

यावेळी छगन भूजबळ म्हणाले, “कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असताना ५४ हजार दुकानांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात अन्नधान्य पुरवले. सगळे बंद होते, केवळ रेशन दुकाने आणि रुग्णालये चालू होती. पोलीस, डॉक्टर आणि रेशन पुरवणारे सगळे कर्मचारी रात्रंदिवस काम करत होते. अनेक अडचणी येऊनही कुठे अन्नधान्य पोहचले नाही, असे झाले नाही.”

पुढे ते असे ही म्हणाले की, गोरगरिबांसाठी अनेक योजना सुरु झाल्या. ते खाते मिळाल्याने आनंदच आहे, सर्वांचे पोट भरणार खात आहे. यावेळी देखील चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. मंत्री एका घटकाचे नसतात. त्यामुळे कोणत्याही खात्यातून विकास साधला जातो. आता शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडविण्यास मदत होईल. पुन्हा एकदा विकास सुरु होण्यास मदत मिळेल.

Ajit Pawar : नवीन मंत्र्यांचे खातेवाटप कधी? अजित पवार म्हणाले, यादी…

या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधूने, गोरख बोडके, उषाताई बच्छाव, राजेंद्र शिंदे, डॉ योगेश गोसावी, संजय खैरनार, सुरेश खोडे, गणेश तिडके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व जानोरी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या