Wednesday, April 24, 2024
Homeनगरराज्यमंत्री बच्चू कडू यांनी नेवासा तालुक्यात ठिकठिकाणी शेतकर्‍यांच्या जाणून घेतल्या व्यथा

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नेवासा तालुक्यात ठिकठिकाणी शेतकर्‍यांच्या जाणून घेतल्या व्यथा

नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa

राज्याचे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नेवासाफाटा, पांढरीपुल, घोडेगाव येथे शेतकर्‍यांना भेटून त्यांच्या व्यथा जाणून त्यांच्या समस्यांची निवेदने स्वीकारली.

- Advertisement -

याप्रसंगी शेतकरी बांधवांनी त्यांचा नागरी सत्कार केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यांच्या हस्ते नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख, जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर सांगळे, प्रहार धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष कृष्णा सातपुते, जिल्हा संघटक अभिजित कालेकर, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, जिल्हा समन्वयक महादेव आव्हाड, नेवासा तालुका कार्याध्यक्ष महारुद्र आव्हाड, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष रघुनाथ शिंदे, राहता तालुका अध्यक्ष दिनेश शेळके, संगमनेर तालुका अध्यक्ष प्रदीप थोरात, नितिन बनसोडे, शरद वारुळे आदी पदाधिकार्‍यांसह प्रहार सैनिक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या