Thursday, April 25, 2024
Homeनगरयंदा पैस खांबाच्या दर्शनाला मुकले लाखो वारकरी

यंदा पैस खांबाच्या दर्शनाला मुकले लाखो वारकरी

नेवासा बु. | वार्ताहर | Newasa Bk.

कामिका एकादशी निमित्त संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पैस खांबाचे दर्शनाला दरसाल अनेक भाविक येत असतात. यावर्षी करोनामूळे अनेक भाविक दर्शनाला मूकले आहे.

- Advertisement -

सकाळ पासूनच मंदिर परिसरात तसेच नेवासा श्रीरामपूर रोड, नगर पंचायत परिसर, उषा टॉकीज, तुकाराम महाराज मंदिर, व संत ज्ञानेश्वर मंदिराच्या मुख्य रोडवर पोलिसांचा मोठा कडक बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट होता. या वेळी कामिका एकादशीमुळे प्रशासनाने नेवासा बंदचे आवाहन केले होते. या बंदला शहरातील नागरिकांनी व दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

कमिका एकादशी निमित्त पहाटे चार वाजता मच्छिंद्र भवार, सौ. शांताबाई भवार, भैय्या साहेब, कावरे शामल कावरे, ह भ प देशमुख महाराज, मंदिर विश्वस्त रामभाऊ जगताप, डॉ.करणसिंह घुले यांच्या हस्ते पैस खांबास वेदमंत्राच्या जयघोषात दुग्ध अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या