भरड धान्य आरोग्यासाठी लाभदायी

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi

2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, संयुक्त राष्ट्रांनी गेल्या वर्षी भारत सरकारच्या पुढाकाराने 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले या प्रस्तावाला इतर 72 देशांनी पाठिंबा दिला होता. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना भरडधान्याचे महत्त्व अधोरेखित केले.

मिलेट्स म्हणजे भरडधान्य हा संपूर्ण पोषक आहार आहे. म्हणूनच याला भारतात ‘श्रीअन्न’सुद्धा म्हंटले जाते. गहू-तांदूळ वगळता ज्या धान्यांवरील नैसर्गिक आवरण भरड करून काढल्यावर त्यांचा वापर आहारात करता येतो. अशा धान्यांना भरडधान्य म्हणतात.

भरडधान्य गटात ज्वारी, बाजरी, राळे, वरई, नाचणी, राजगिरा, डेंगळी आदी तृणधान्ये मोडतात. गहू-तांदूळ या धान्यात ग्लुटेन घटक असतो. त्यामुळे त्यांचा समावेश भरडधान्यांत केला जात नाहीत. कोणत्याही भरडधान्यात ग्लुटेन हा घटक नसतो.

पूर्वी उखळ-मुसळ वापरून अशा धान्यांवरील कवच किंवा साळ, साल काढली जाई. नंतर दगडी जात्यावर दळून त्या भरडीचे पीठ केले जात असे. कालौघात उखळ-मुसळीच्या जागी पीठ गिरण्या आल्या. शेतीक्षेत्रात आधुनिक संशोधने झाली. विविध पिकांच्या संकरीत आणि सुधारित जातीही संशोधित होऊन वापरात आल्या. त्यामुळे भरडधान्याचे महत्त्व मागे पडत गेले.

भरडधान्याचे लाभ

श्रीअन्नाची म्हणजेच भरडधान्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात ग्लूटेन शून्य टक्के असतो. ग्लुटेन म्हणजे प्रोलेमीन प्रोटिनचा एक भाग. हा घटक अनेकांना पचत नाही अथवा त्याची अ‍ॅलर्जी असू शकते. ग्लुटेन गरम झाल्यावर त्यातील चिकटपणा वाढतो. ग्लुटेनमुळे प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम संभावतो. भरडधान्यात ग्लुटेन नसल्याने त्यातून शरिराला उत्तम पोषण मिळू शकते. शिवाय भरडधान्यांतील विविध पोषणमूल्यांमुळे मधुमेह, रक्तक्षय रोखण्यासाठीही मदत होऊ शकते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *