Thursday, April 25, 2024
Homeजळगावबी ग्रेड तुपाचे उत्पादनास दूध संघाला परवानगीच नाही!

बी ग्रेड तुपाचे उत्पादनास दूध संघाला परवानगीच नाही!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

दूध संघाला (milk union) खाण्यायोग्य (edibles) असलेल्या पदार्थांच्या उत्पादनासाठी परवाना (License to manufacture) देण्यात आला आहे. मात्र या पदार्थाव्यतिरिक्त इतर कोणताही पदार्थाचे (any substance)उत्पादन करण्यास परवानगी (Even when production is not permitted) नसतांनाही दूध संघाकडून (milk union) (स्पॉईल्ड फॅट) बी ग्रेड तुपाचे (Production of B Grade Ghee) उत्पादन करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने (Department of Food and Drug Administration) दिलेल्या अहवालातून (Report) उघड झाली आहे. हा अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. दरम्यान, अटकेतील सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

- Advertisement -

खडसेंच्या मुलाचे काय झाले? हा संशोधनाचा विषय

जिल्हा दूध संघाने अन्न व सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत केंद्रीय अन्न परवाना घेतला असून त्याद्वारे केवळ खाद्य पदार्थांचे उत्पादन करण्यास परवानगी असते. मात्र असे असतांना देखील दूध संघाने स्पॉईल्ड फॅट म्हणजेच बी ग्रेड तुपाचे उत्पादन करुन ते तूप विठ्ठल रुख्मिणी एजन्सीच्या माध्यमातून विक्री केले आहे. तसेच होलसेल दराने कमी दरात तुपाची विक्री केलेली एजन्सीला देखील या तुपाची विक्री करण्यास देखील परवानगी नव्हती. त्याचप्रमाणे विठ्ठल रुख्मिणी या एजन्सीकडे रिटेल विक्रीचा परवाना असून त्या एजन्सीला कमी किंमतीत मोठ्या प्रमाणात होलसेल दरात अखाद्य तुपाची विक्री केली आहे. यासोबत अखाद्य पदार्थाची देखील घाऊक विक्री नंदकुमार स्टोअर्स या अन्न आस्थापनेला केल्याची बाब सुध्दा अन्न औषध प्रशासनाने पोलिसांना दिलेल्या अहवालातून उघड झाली आहे.

संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

संशयित निखिल नेहते, मनोज लिमये, हरि पाटील, किशोर पाटील, अनिल अग्रवाल, चंद्रकांत पाटील, रवी अग्रवाल यांना अटक झाली असून सोमवारी त्यांना पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीअंती सातही जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Photos # …तर यावलमध्ये हिवाळ्यात जाणवणार कृत्रीम पाणीटंचाई

मुलांच्या आरोग्याशी खेळ

बी ग्रेड हे अखाद्य तुप राजेमलाई चॉकलेटमध्ये वापरल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ करून त्यांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. कुठल्याही प्रकरणात खरेदी केलेल्या पदार्थाचे बील घेऊन त्यानुसार त्याचे मूल्य चुकविणे आवश्यक असते. त्यानुसार राजेमलाई चॉकलेटचे उत्पादक यांची जबाबदारी होती. परंतू, प्रत्यक्षात त्यांनी सदर तुप 109 रूपये एवढ्या कमी किंमतीत खरेदी केले आहे. तसेच य व्यवहारामध्ये कुठेही बिलिंग झालेले नाही हे दिसून येत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालात नमूद केले आहे.

सखोल तपासासाठी विशेष पथक आवश्यक

या प्रकरणात आरोग्य हिताच्या दृष्टीने पोलीस विभाग, केंद्रीय अन्न परवाना अधिकारी तसेच जळगाव जिल्हा अन्न व औषध विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष पथक स्थापन करून सखोल तपास होणे आवश्यक असल्याचे मत अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सं. ता. पतंगे यांनी पोलिसांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या