Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedगायीच्या दुधाला किमान ४२ रुपये भाव द्या

गायीच्या दुधाला किमान ४२ रुपये भाव द्या

औरंगाबाद – aurangabad

दूध संघ (Milk) व दूध कंपन्या (Farmers) शेतकर्‍यांच्या हिताबाबत अशी तत्परता दाखवत नाहीत. सध्या दूध दरामध्ये काहीशी वाढ झाल्याचे दिसत असले तरी, प्रत्यक्षात उन्हाळ्यामुळे व अर्थव्यवस्थेतील शेतकरी विरोधी धोरणामुळे दुधाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर किमान ४२ रुपये दर शेतकर्‍यांना द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने (Milk Producers Farmers Struggle Committee) केली आहे.

- Advertisement -

ऊन व नैसर्गिक वातावरणाचा परिणाम म्हणून दुधाचे उत्पादनही घटले आहे. अशा पार्श्वभूमीवर किमान ४२ रुपये दर शेतकर्‍यांना द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कोसळून १८० रुपये प्रति किलोपर्यंत खाली गेले होते. कोविडचा काही प्रमाणात प्रतिबंध झाल्यामुळे व आंतरराष्ट्रीय पातळीवर दुधाचे उत्पादन सीमित झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरचे दर आता ३०० रुपये प्रति किलोपर्यंत बधारले आहेत. देशांतर्गत बाजारातही दूध पावडरला प्रति किलो ३२५ रुपये दर मिळत आहे. उन्हाळ्यामुळे देशांतर्गत दुधाचे प्रमाण घटल्यामुळे दूध पावडर बनवण्यासाठी पुरेसे दूध उपलब्ध होत नसल्याने देशांतर्गत दूध पावडरचा साठा झपाट्याने संपत चालला आहे. परिणामी येत्या काळात दूध पावडरचे दर आणखी वाढण्याच्या शक्‍यता आहेत. जून अखेरपर्यंत दूध पावडरच्या दरामध्ये तेजी कायम राहणार आहे. अशा पार्श्वभूमीवर गायीच्या दुधाला किमान ४२ रुपये दर देणे सहज शक्‍य असल्याचे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने म्हंटले आहे.

राज्याचा दुग्ध विकास विभाग गेली अनेक वर्ष निष्क्रिय भूमिकेत आहे. दुग्ध विकास मंत्री दूध उत्पादकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय परिस्थिती पाहता दुग्ध विकास मंत्री व दुग्ध विकास विभागाने शेतकऱ्यांच्या बाजूने तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता असल्याचे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या