Wednesday, April 24, 2024
Homeनगरदुधाचे दर घसरत असल्याने दूध उत्पादकांच्या चिंतेत वाढ

दुधाचे दर घसरत असल्याने दूध उत्पादकांच्या चिंतेत वाढ

सोनेवाडी |वार्ताहर| Sonewadi

शेतकरी व दूध उत्पादकांना दोन पैसे मिळवून देणारा धंदा आता अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतरही दुधाच्या दरात कपात होत असल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

- Advertisement -

दुधाला किमान 30 रुपये दर अपेक्षित असताना शेतकरी व दूध उत्पादकांना केवळ 20 ते 22 रुपये दर मिळत आहेे. गाई म्हशीला लागणारा चारा, खुराक व इतर गोष्टींचा विचार केला तर शेतकर्‍याच्या हातात काही शिल्लक राहत नाही. दुधाच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा दूध उत्पादकांना होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून दुधाच्या दरात अजूनही एक रुपया कपात होण्याची चिन्हे दिसत असल्याने शेतकर्‍यांनी आता हा दूध धंदा करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सर्व दूध उत्पादक संघांनी दूध खरेदीचे दर घसरविल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने बाजारपेठ खुल्या केल्या. मंदिरे उघडली हॉटेल तसेच इतर व्यवसाय ही जोरात सुरू झाले. दुधाची मागणीही वाढली मात्र दुधाचे दर मात्र कमी होत आहेत. दुधाचे दर 30 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच शेतकर्‍यांना दूध धंदा परवडतो.

गाई म्हशीला चारा, खुराक व इतर गोष्टींना दररोजचा एका जनावरासाठी 250 रुपये खर्च येतो. दहा लिटर दुधाची सरासरी काढली तर दुधाचे 200 ते 230 रुपये मिळतात. दुधाला किमान 35 रुपये भाव अपेक्षित आहे. आज रोजी दुधाच्या धंद्यापासून एक रुपयाही नफा मिळत नाही.

– जालिंदर बोंडखळ, शेतकरी

- Advertisment -

ताज्या बातम्या