Saturday, April 27, 2024
Homeनगरदूध दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा

दूध दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेतकर्‍याच्या दुधाला 25 रुपये दर मिळावा, यासह शेतकर्‍यांच्या खात्यावर पाच रुपये प्रती लिटर सरकारने अनुदान वर्ग करावे, या मागणीचा जिल्हाधिकारी यांनी सरकार दरबारी गंभीरपणे पाठपुरावा करावा, अन्यथा येत्या 20 ऑगस्टला शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी दिला आहे.

- Advertisement -

मंगळवारी जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मोरे यांनी स्पष्ट केले की, शासन नियमानुसार गायीच्या दुधाला 3.5 ते 8.5 फॅटपर्यंत 25 रुपये प्रती लिटर असा दर देणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यात शेतकर्‍यांना अवघा 17 रुपये लिटर हा दर देण्यात येत आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

शासमाने दुध उत्पादकांना प्रती लिटर 5 रुपये अनुदान थेट उत्पादकांच्या खात्यावर जमा करणे गरजेचे झाले आहे. यासह गायीच्या दुधाला प्रती लिटर 25 रुपये दर मिळावा या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खा. शेट्टी याच्या नेतृत्वाखाली 20 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर लॉकडाऊन, प्रतिबंधात्मक क्षेत्र, सामाजिक आंतरचे नियम न पाळता जनांवरासह मोर्चा काढण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष मोरे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिलेल्या निवेदनात सुनील लोंढे, शरद मरकड, सतीष पवार, प्रमोद पवार, शंकरराव लहारे, रविराज जाधव, मंगेश असबे, संतोष गायकवाड यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या