Friday, April 26, 2024
Homeनगरदुधात भेसळ करणारा डेअरीचालक गजाआड

दुधात भेसळ करणारा डेअरीचालक गजाआड

राहुरी (प्रतिनिधी)-

दुधामध्ये पावर ऑइलची भेसळ करणारा #दूध डेअरीवाला राजेंद्र चांगदेव जरे याला #राहुरी पोलिसांनी गजाआड केले.

- Advertisement -

एकीकडे सध्या राज्यभर #लॅाकडाऊन चालू असून दुधाची मागणी प्रचंड कमी झालेली आहे. तसेच हॉटेल व्यवसाय, चहाची दुकाने, मिठाईची दुकाने, कॅन्टीन बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटून दूध साठा शिल्लक राहत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राहुरीतील एका बड्या दूध भेसळ वाल्यावर राहुरी #पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

आरोपी राजेंद्र चांगदेव जरे, वय 31 वर्षे, राहणार- चंडकापूर, पोस्ट केंदळ, ता.राहुरी याने गाईच्या दुधात #लाईट_लिक्विड_पॅराफीन हे पावर ऑईल व व्हे पावडर असे भेसळ पदार्थ मिसळून मनुष्यास खाण्यास असुरक्षित आणि मनुष्याच्या जीवितास धोकेदायक असे दूध तयार करून त्याची विक्री केली आणि मानवी जीवितास हानी पोहोचविली. म्हणून फिर्यादी प्रदीप कुटे, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग, नगर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 340/2021 भादंवि. कलम 328,273 व अन्नसुरक्षा मानके कायदाचे कलम 26 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दूध भेसळीत आरोपी राजेंद्र जरे याचे अन्य कोणी साथीदार आहेत का? आरोपी जरे याने कोठेकोठे असे भेसळयुक्त दूध वितरित केले व विकले? आरोपी हा भेसळीचे ऑईल व पावडर कुठून आणत होता? अशा सगळ्या प्रश्नांचे उत्तर पोलीस तपासात मिळू शकते. तसेच यामध्ये कोणा-कोणाचा हात आहे? कोणते मोठे मासे याप्रकरणी गळाला लागतात, त्यांची मोठी दूध भेसळवाल्यांची साखळी राहुरी तालुक्यात उघड होणार का? हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

अशा मानवी जीविताशी खेळणार्‍या समाजघातक प्रवृत्ती विरोधात अतिशय कठोरात कठोर कारवाई करावी, अशी समाजातून मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या