Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसैन्यदलात भरती प्रक्रिया; तोतयांकडून युवकांची होतेय फसवणूक

सैन्यदलात भरती प्रक्रिया; तोतयांकडून युवकांची होतेय फसवणूक

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

सध्या नाशिक शहरात (nashik city) विविध शक्कल वापरून गुन्हेगार (criminal) सायबर क्राईम (Cybercrime) करत असून आता सैन्यदलातील (army) अधिकारी असल्याचे भासवून हजारो रुपयांची व्यापार्‍यांची फसवणूक (Fraud) झाल्याचा घडला आहे.

- Advertisement -

मी आर्मी ऑफिसर बोलतोय… आमचे कर्नल आपल्याकडे येऊन गेले आहेत. मिलिटरीसाठी (Military) आम्हाला आपल्याकडून जास्त प्रमाणात माल हवा आहे व त्याचे पेमेंट आपणांस गेटवर आल्यावर तत्काळ दिले जाईल, असा फोन नाशकातील बर्‍याच व्यापार्‍यांना आल्यानंतर संबंधितांच्या व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) क्रमांकावर आर्मीचे बनावट ओळखपत्र (Fake ID) पाठवले जाते.

आर्मीबद्दल (army) आदर असल्याने समोरील व्यक्तीवर विश्वास जातो. त्यानंतर व्यापारी आर्मीच्या गांधीनगर किंवा वडनेर गेटवर आपला माल घेऊन जातात आणि त्यानंतर तोतया आर्मी ऑफिसरला कॉल केल्यानंतर आर्मीचे नियम सांगत व्यापार्‍याचा फोन पे, गुगल पे क्रमांक मागून त्यावर आधी काही पैसे टाकले जातात व त्यानंतर व्यापार्‍याला विश्वासात घेऊन स्कॅनर पाठवले जाते व ते स्कॅन झाल्यावर अकाउंटवर असलेले सर्व समोरील तोतया अधिकारी काढून घेतो.

अशाप्रकारे नाशिकमध्ये (nashik) सायबर फसवणूक (Cyber ​​fraud) केली जात आहे. यातील काही जणांनी सायबर क्राईमकडे (Cybercrime) जाऊन आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे तर काही जण लोक आपल्याला वेड्यात काढतील म्हणून तक्रार देत नाही. सायबर क्राईमकडून लोकांना वेळोवेळी सायबर गुन्ह्यांबाबत माध्यमांतून सूचित करत असतात. मात्र तरीही सदरहू भामटे ना काही नवीन शक्कल लढवून सायबर क्राईम करत आहेत.

माझी देखील अशाच प्रकारे सायबर फसवणुकीला सामोरे जावे लागले होते. रक्कम खूप छोटी होती, मात्र लोकांमध्ये जनजागृती व्हावी, याकरिता सायबर क्राईममध्ये तक्रार केली.

– ज्ञानेश्वर रेवगडे, तक्रारदार

- Advertisment -

ताज्या बातम्या