Thursday, April 25, 2024
Homeनंदुरबारशहादा येथे भूकंपाचे सौम्य धक्के

शहादा येथे भूकंपाचे सौम्य धक्के

शहादा | ता. प्र. Shahada

तालुक्यातील वडाळी, जयनगर परिसरात आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के जाणवले. धक्क्यांची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली.

- Advertisement -

शहादा तालुक्यातील काही गावांमध्ये आज दुपारी एक वाजून 24 मिनिटांनी 3.2 रिश्टर स्केल तर एक वाजून 26 मिनिटांनी 2.6 रिश्टर स्केलं एवढ्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.

सुदैवाने यात कुठलीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्यप्रदेशातील शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात असल्याची माहिती सावळदा येथील भूकंपमापक अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या