Friday, April 26, 2024
Homeनाशिकसुरगाणा, त्र्यंबक येथून मजुरांचे स्थलांतर

सुरगाणा, त्र्यंबक येथून मजुरांचे स्थलांतर

हतगड | Hatgad

जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मजूर हळूहळू मोठ्या मजुरीसाठी स्थलांतर करीत आहेत.

- Advertisement -

दरम्यान दरवर्षी प्रमाणे शेतीची कामे संपल्यावर या भागातील लोक कामासाठी बाहेर पडतात. सध्या कोरोनाचे सावट असले तरीही येथील नागरिक पोटासाठी रोजगाराच्या शोधार्थ निघाले आहेत.

जिल्ह्यातील पिंपळगाव, लासलगाव, निफाड, दिंडोरी, चांदवड, आदी भागात काम करण्यासाठी स्थलांतर होत आहेत. बाहेर गावी जाऊन बऱ्यापैकी रोजगार मिळतो.

त्यामुळे महिने दोन महिने हे नागरिक शिधा घेऊन बाहेरगावी जातात. येथील नागरिक पावसाळी शेतीवर अवलंबून असतात. इतर कामे नसल्याने उपासमारीची वेळ येते.

अनेक वर्षांपासून या तालुक्यातील नागरिकांचे स्थलांतर ही समस्या चालू आहे. अद्यापही येथील लोकांच्या स्थलांतरावर लोकप्रतिनिधींनी उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या