Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशमायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचं वयाच्या २६ व्या वर्षी निधन, 'या'...

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचं वयाच्या २६ व्या वर्षी निधन, ‘या’ आजाराने होता ग्रस्त

दिल्ली | Delhi

दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला (Satya Nadella) यांना पुत्रशोक झाला आहे. तरुण मुलाचे निधन झाल्यामुळे सत्या नडेला यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- Advertisement -

सत्या नाडेला यांचा मुलगा झैन नडेला (Zain Nadella) हा २६ वर्षांचा होता. झैनला सेरेब्रल पाल्सी (cerebral palsy) नावाचा दुर्मिळ आजार होता. कंपनीने आपल्या एका मेलमध्ये एग्झिक्यूटिव्ह स्टाफला झैनच्या निधनाबद्दल माहिती दिली. तसेच, संदेशात एग्झिक्यूटिव्ह्सला त्यांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितले आहे.

सेरेब्रल पाल्सी हा आजार लहान मुलांमध्ये जन्मतः आढळून येतो, याला मेंदुचा पक्षघात म्हणूनही ओळखलं जातं. या आजारात स्नायू काम्जोर असतात. शारिरीक क्रियांमध्ये समन्वय नसल्याने अनेक हालचालींवर बंधनं येतात.

जगात दरवर्षी सुमारे ३० हजार मुलांमागे ३ मुले या आजाराने ग्रस्त आहेत. या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ६ ऑक्टोबर हा दिवस जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन (World Cerebral Palsy Day) पाळला जातो.

- Advertisment -

ताज्या बातम्या