Wednesday, April 24, 2024
Homeनगरसूक्ष्म सिंचनाचे अनुदान आले; जिल्ह्यासाठी 'एवढे' कोटी मिळणार !

सूक्ष्म सिंचनाचे अनुदान आले; जिल्ह्यासाठी ‘एवढे’ कोटी मिळणार !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात 2022-23 मध्ये ‘प्रति थेंब अधिक पीक’ घटकाच्या अंमलबजावणीसाठी 666 कोटी रुपये मिळणार असून या घटकातून सन 2022-23 करिता सर्वसाधारण प्रवर्गाचा दुसरा हप्ता 130 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 33 कोटी 48 लाख 99 हजार 282 रुपयांचा निधी मिळणार आहे. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. हे अनुदान मिळावे यासाठी शेतकरी संघटनेचे शिवाजी जवरे तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे.

- Advertisement -

पहिल्या हप्त्यापोटी केंद्राने अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना 20 कोटी रुपये, अनुसूचित जमातीमधील शेतकर्‍यांना 10 कोटी रुपये, तर इतर शेतकर्‍यांसाठी 78 कोटी रुपये दिले आहेत.

राज्याने स्वतःच्या तिजोरीतून अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांना 8 कोटी रुपये, अनुसूचित जमातीमधील शेतकर्‍यांना 6.66 कोटी रुपये, तर इतर शेतकर्‍यांसाठी 52 कोटी रुपये दिले आहेत.

राज्यात केंद्र व राज्याचा मिळून आतापर्यंत 166 कोटींचा निधी यापूर्वीच देण्यात आलेला आहे. केंद्राने आता नव्याने दुसरा हप्ता 130 कोटी रुपयांचा पाठवल्याने दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सन 2022-23 करीता रक्कम रु 666.67 कोटी च्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे. पहिला हप्ता रु 166.66 कोटी प्राप्त झाला असुन सदर निधीची निधी मर्यादा यांपूर्वीच निश्चित करुन देण्यात आलेली आहे.

शासन निर्णयान्वये सन 2022 – 23 करीता सर्वसाधारण प्रवर्गाचा दुसरा हप्ता 130.00 कोटी निधी प्राप्त झाला आहे. सदर योजनेअंतर्गत मंजूर निधीचे जिल्हानिहाय वितरण करण्यास तसेच खर्चावर नियंत्रण करण्यासाठी आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय पुणे यांना प्राधीकृत करण्यात आले आहे. प्राप्त झालेला निधी आहरीत व संवितरीत करण्यासाठी कृषि आयुक्तालय स्तरावरील सहाय्यक संचालक लेखा – 1 यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

सन 2020-21,2021-22 व 2022-23 मध्ये ज्या लाभार्थ्याची सुक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत सोडतीमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यापैकी मार्गदर्शक सुचनेप्रमाणे पुर्वसंमती मिळाल्यानतंर देयके अपलोड करुन व ज्यांची मोका तपासणी पूर्ण करुन अनुदान अदायगीसाठी शिफारस झाली आहे. अशा लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्यासाठी जिल्हास्तरावर उघडण्यात आलेले सदर योजनेचे Child Account करीता खालीलप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गाकरीता अतिरिक्त निधी मर्यादा निश्चित करण्यात येत आहे. सदरचा निधी प्राथम्याने सन 2020-21 व 2021-22 मधील लाभार्थ्याकरीता खर्च करण्यात यावा. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या