Wednesday, April 24, 2024
Homeक्रीडाWPL 2023 : अंतिम सामना आज; 'या' दोन संघांमध्ये होणार लढत

WPL 2023 : अंतिम सामना आज; ‘या’ दोन संघांमध्ये होणार लढत

मुंबई | Mumbai

महिला प्रीमियर लीग  (WPL 2023) चा अंतिम सामना आज मुंबईच्या ब्रेबॉर्न क्रिकेट मैदानावर (Brabourne Cricket Ground) खेळविण्यात येणार असून हा सामना सायंकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे…

- Advertisement -

नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीला आवरा; भुजबळांनी दिला इशारा

महिला आयपीएलच्या विजेतेपदाचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians vs Delhi Capitals) या दोन संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघांमध्ये महिला आयपीएलच्या हंगामातील हा तिसरा सामना असून याआधी झालेल्या साखळी सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी १-१ ने विजय मिळविला आहे. साखळी फेरीत झालेल्या ८ सामन्यांत दोन्ही संघांनी ६ विजय आणि २ पराभवांसह १२ गुणांची कमाई करताना अव्वल दोन स्थानांमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

ठाकरेंच्या मालेगावातील सभेआधी संजय राऊतांचा शिंदेंवर ‘वार’, दादा भुसेंना दिला इशारा

तसेच दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात यूपी वॉरियर्सवर दुसऱ्यांदा मात करत गुणतालिकेत अव्वल स्थान निश्चित करत थेट अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सवर ( UP Warriors) एलिमिनेटर सामन्यात ७२ धावांनी धुव्वा उडवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

दादा भूसेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार उद्धव ठाकरेंची तोफ; अद्वय हिरेंचे असणार शक्ती प्रदर्शन

दरम्यान, मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांनी साखळी सामन्यांच्या अखेरच्या सामन्यात विजय संपादन केल्यामुळे दोन्ही संघ अंतिम फेरीपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे अंतिम सामना जिंकून नेमका कोणता संघ महिला आयपीएलचे विजेतेपद पटकविण्यात यशस्वी ठरणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या