Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमी आहे.. उभाय इथे

मी आहे.. उभाय इथे

जरा वेळ का बोलायचं थोडं

मी फार वर्षांपासून उभाय इथे

- Advertisement -

आजूबाजूला होत माझा कुटुंब

पण काही पाण्या आभावी जळून गेली तर काही तोडली नेईल

मी आहे, उभाय इथे

कालच ऐकू आला माझ्या कानावर की मला ही तोडणार आहे म्हणे

कारण माझा पसारा पडतोय (पान ) तो आवरता येत नाही कारण पान वाळून गेलीय

कारण अस म्हणतात ओल पान खाली पडत नाही

जे काही पडलं ते काही कामाचं नाही

आणि आता फळ पण येत नाही आणि माझ्या अंगावर जास्त पान राहत नाही आता गळून जातात म्हणून माझी सावली पण पडत नाही,

मग नुसता सांगाडा काय कामाचा

मग एक जण बोललं आपण तोडून टाकु आणि त्या लाकडाच्या खुर्च्या बनवू,

मला वाटलं माझ्या इतकं भाग्यवान कोणीच नसेल

मनात आलं माझा प्रवास इतकाच होता का

उंच झालोय मी पण पोचलो नाही कुठे

पहिले पान ,फुल ,फळ, माझी सावली ,सर्वाना हवी हवी शी वाटायची,

आता माझ्या काहीच नाही

पूर्ण दिल मी

तुला पण झालं का कधी अस

तू पोचला का कुठे

की फक्त उभाय इथे

चालतोय म्हणून जिवंत आणि मी उभाय म्हणून तोडताय

..विक्रम सोनवणे, Mo.. 9765173740

- Advertisment -

ताज्या बातम्या