Friday, April 26, 2024
Homeनाशिकम्हेळूस्के सोसायटी बिनविरोध

म्हेळूस्के सोसायटी बिनविरोध

म्हेळूस्के । वार्ताहर | Mheluske-Dindori

म्हेळुस्के (Mheluske), ता. दिंडोरी (dindori taluka) येथील विविध कार्यकारी सोसायटीवर (Executive Societies) ‘ग्रामविकास पॅनलने’ निर्विवाद वर्चस्व राखत सर्वच्या सर्व जागा बिनविरोध निवडून आणत एकहाती सत्ता मिळवली.

- Advertisement -

ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी चेअरमन गोटीराम बर्डे (Former Chairman Gotiram Barde), उपसरपंच योगेश बर्डे यांनी केले होते. या विजयानंतर सभासद, ग्रामस्थ व कार्यकर्ते यांनी जल्लोष साजरा करतांना गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी केली. संचालक मंडळाच्या एकूण 12 जागांसाठी सर्वसाधारण कर्जदार गटातून भगवंत संतु बर्डे, यादव त्र्यंबक बर्डे, संजय खंडेराव शिंदे, सचिन माधवराव बर्डे, दत्तू वामन चौधरी, शिवराम सजन बर्डे, शंकर सजन बर्डे, सुखदेव राघो बर्डे,

महिला राखीव गटातून संगीता सुनिल बोराटे व इंदूबाई सदाशिव बर्डे, इतर मागास प्रवर्गातून वसंत बबन पगार, अनुसूचित जाती-जमाती राखीव प्रतिनिधी गटातून विठ्ठल पुंजा बेंडकुळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडूनही मोर्चेबांधणी केली जात होती, परंतु घटनादुरुस्तीच्या नविन नियमानुसार थकबाकीदार वगळता चालू बाकीत असणार्‍या सभासदांनाच निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार असल्याने

बर्‍याच सभासदांचा हिरमोड झाल्याने पर्यायाने चालू बाकी सभासद संख्या कमी असल्या कारणाने दोन पॅनल होणे जवळपास अशक्य होते. परंतु याही परिस्थितीत विरोधकांना कुठेही संधी न देता ’ग्रामविकास पॅनल’ने आपली प्रतिष्ठा पणाला लावत पॅनलची निर्मिती करत सर्वच्या सर्व जागांवर आपले उमेदवार निश्चित करून बिनविरोध निवडणूक पार पाडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे. एस. गायकवाड यांनी काम बघितले.

म्हेळुस्के ग्रामपंचायत पाठोपाठ म्हेळुस्के सोसायटीत देखील सन्माननीय सभासद बंधू-भगिनी आणि ग्रामस्थ यांनी ‘ग्रामविकास पॅनल’वर विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे आभारी आहोत.सर्व सभासदांना विश्वासात घेऊन आगामी काळात कामकाज केले जाईल.

– योगेश बर्डे, ग्रामविकास पॅनलप्रमुख

- Advertisment -

ताज्या बातम्या