Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई आता कोर्टात! 'हे' दिग्गज वकील मांडणार बाजू

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची लढाई आता कोर्टात! ‘हे’ दिग्गज वकील मांडणार बाजू

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात सुरू असलेला सत्ता संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जाऊन पोचला आहे. शिवसेनेच्या (shivsena) बंडखोर आमदारांच्या गटाने सर्वोच्च न्यायलायात (rebel mla group ) धाव घेतली आहे.

- Advertisement -

एकनाथ शिंदे (eknath shinde) गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणी होणार आहे.

एकनाथ शिंदे यांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामांकित वकील हरीश साळवे मैदानात उतरले आहेत. तर महाविकास आघाडीच्या बाजूने जेष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी असणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या