Thursday, April 25, 2024
Homeनाशिकसिन्नरमधील म्हाळुंगी नदीला यंदाचा पहिलाच पूर

सिन्नरमधील म्हाळुंगी नदीला यंदाचा पहिलाच पूर

सिन्नर। Sinner

सध्या नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने गुरुवार पासून पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील नदी नाले ओढे शुक्रवारपासून दुथडी भरुन वाहत आहे.

- Advertisement -

अशातच सिन्नर तालुक्यातील ठाणगावसह म्हाळुंगी नदीचे उगमस्थान असलेल्या विश्रामगड परिसरात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने यंदा पहिल्यांदाच म्हाळुंगी नदीला पूर आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून परिसरात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाले होते.

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; राज्य सरकारने ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढवला महागाई भत्ता

मात्र, आता दमदार पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिकेही करपून जाता की काय अशी भिती शेतकऱ्यांमध्ये होती.

Photo Gallery : नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

शेतकऱ्यांच्या डोक्यावर दुबार पेरणीचे संकट घोंघावत असतानाच आता पावसाची सुरुवात झाल्याने पिकानांही संजीवनी मिळणार आहे. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर मोठा पाऊस झाल्याने म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. दमदार पावसास सुरवात झाल्याने वाटाणा, टोमॅटो, सोयाबीन, चायना भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या