भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन राजकीय इनिंग सुरु करणार

दिल्ली l Delhi

कोलकाता ते दिल्ली मेट्रोसाठी मोठे योगदान असलेले आणि मेट्रो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ई श्रीधरन आता राजकीय इनिंग सुरू करणार आहेत.

ई श्रीधरन लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. केरळमध्ये ई. श्रीधरन यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती केरळ भाजपाचे के. सुरेंद्रन यांनी दिली. २१ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या विजय यात्रेदरम्यान ई. श्रीधरन औपचारिकरित्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. ई श्रीधरन आता राजकारणात उतरणार असल्यामुळे त्यांच्याकडून वेगळे काहीतरी करून दाखवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

८८ वर्षांचे ई. श्रीधरन हे असून त्यांचा जन्म मद्रास संस्थानामध्ये १९३२ साली करुकापुथूर येथे झाला होता. ई श्रीधरन यांना देशात मेट्रो रेल्वेमध्ये केलेल्या महत्वपूर्ण कामामुळे मेट्रो मॅन म्हणून पाहिले जाते. दिल्ली मेट्रोच्या जवळपास प्रत्येक टप्प्याचे काम ई श्रीधरन यांनी वेळेच्या आधी पूर्ण केले होते. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान श्रीधरन यांना मिळालेले आहेत. त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी केलेल्या कामानिमित्त त्यांचा जगभरामध्ये नावलौकिक आहे. त्यांना २००१ साली पद्मश्री तर २००८ साली पद्म विभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फ्रान्स सरकारने त्यांना २००५ साली विशेष पुरस्कार जाहीर केला होता. तर २००३ साली टाइम मॅगझिनने त्यांचा उल्लेख आशियाज हिरो या नामावंत व्यक्तींच्या यादीमध्ये केला होता. श्रीधरन यांनी १९५३ साली इंजिनियरिंग सर्व्हिस एक्झाम दिली आणि ते डिसेंबर १९५४ साली दक्षिण रेल्वेमध्ये कार्यरत झाले. त्यांनी त्यानंतर आपल्या हुशारीच्या जोरावर रेल्वेमध्ये स्वत:ची छाप पाडली. १९६४ साली वादळाच्या तडाख्यामध्ये रेल्वेचा महत्वाचा ब्रिज वाहून गेल्यानंतर, श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली तो अवध्या ४५ दिवसांमध्ये उभारण्यात आला. यासाठी सहा महिन्याचा अवधी दक्षिण रेल्वेने दिला असताना अवघ्या दीड महिन्यामध्ये श्रीधरन यांनी हे काम करुन दाखवले. कोकण मेट्रो प्रोजेक्टवर १९७० ते १९७५ दरम्यान ते काम करत होते. कोकण रेल्वेचा मार्ग कसा बांधता येईल, त्याची रचना कशी असावी, तो प्रत्यक्षात कसा साकारता येईल यासंदर्भातील सर्व नियोजन श्रीधरन यांनी केले. त्यावेळी कोकण रेल्वे हा भारतामध्ये उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूपच आव्हानात्मक प्रकल्प होता. पण हे आव्हान श्रीधरन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अगदी सहज पूर्ण केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *