Thursday, April 25, 2024
Homeनगरउर्वरीत काळात चांगला पाऊस पडून धरणे 80 ते 90 टक्के भरतील

उर्वरीत काळात चांगला पाऊस पडून धरणे 80 ते 90 टक्के भरतील

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

उर्वरीत सप्टेंबर महिना व पुढील ऑक्टोबर महिन्यात राज्यात चांगला पाऊस पडेल व जवळपास सर्व धरणे 80 ते 90 टक्क्यापर्यंत भरतील असा अंदाज हवामान अंदाज तज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील खुपटी येथील शेतकर्‍यांच्यावतीने त्यांचा खुपटी येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता, त्याप्रसंगी डख यांनी उर्वरीत पावसाळ्यातील पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त केला.

मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, राज्यात पुन्हा या आठवड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार व काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडणार आहे. सर्व जनतेने सतर्क रहावे. राज्यातील धरण क्षेत्रात नवीन पाण्याची आवक देखील चांगल्या प्रमाणात होणार आहे. नदी काठच्या जनतेने सतर्क रहावे.

माझा पावसा बद्दलचा अंदाज तंतोतंत खरे होत असेल तरी पण स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकते हेही शेतकर्‍यांनी लक्षात घेतले पाहिजे.

राज्यातील पूर्वविदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागामध्ये पाऊस पडणार आहे. पण यात देखील पावसाचे प्रमाण कमी अधिक असणार आहे, त्यामुळे काही भागात रिमझिम पाऊस पडेल, असाही अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सुत्रसंचालन बाळासाहेब चौधरी यांनी केले. प्रास्तावीक प्रा. पोपटराव वरुडे यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी सरपंच राजश्रीताई तनपुरे उपसरपंच शशीकांत कार्ले. पंचगंगा सीडचे काकासाहेब ससे, पंचायत समिती पाचेगाव गणाचे सदस्य विक्रम चौधरी, बेलपिपळगाव येथील अमरदीप शेरकर, गुलाब चौधरी, सोपान ससे, दत्तात्रय वरुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या