Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedअरे बापरे ; अवकाळीचा तडाखा सुरूच राहणार!

अरे बापरे ; अवकाळीचा तडाखा सुरूच राहणार!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

मार्च महिन्यातील अवकाळी पावसानंतर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री शहर परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, आता येणाऱ्या आठवड्यातील १३ आणि १४ एप्रिल रोजी शहराला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एकंदरच अवकाळी पावसाने राज्यभरात धुमाकूळ सुरूच ठेवला असल्याचे चित्र आहे. 

- Advertisement -

सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांची खैर नाही!

दरम्यान, शुक्रवारी संपूर्ण मराठवाड्यात तसेच शहर परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शनिवारी शहरातील वातावरणात बदल झाला असून कमाल व किमान तापमानात मोठी घट झाली आहे. यामुळे रविवारी दिवसभर शहरावर ऊन चकाकत असले तरी उन्हाची तीव्रता मात्र कमी होती,  शहरात कमाल तापमान ३१. ५ अंश सेल्सियस तर किमान तापमान १८.८ अंश सेल्सियस होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ९ एप्रिल रोजीही शहरावर ढगांची झाकोळ राहणार आहे, १० व ११ एप्रिल रोजी सकाळी व संध्याकाळी काहीसे ढगाळ वातावरण राहणार असले तरी पावसाचा मात्र अंदाज नाही. मात्र, १२ एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता आहे, तर आठवड्याच्या शेवटी १३ व १४ एप्रिल रोजी शहरात ढगांच्या गर्दीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

ऐन उन्हाळ्यात कधी कडक ऊन तर कधी अवकाळी पाऊस अशी अवस्था शहराची झाली आहे, गेल्या महिन्यात अवकाळीच्या फटक्यानंतर आता एप्रिल महिन्यामध्ये शहरावर विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.

तापमानात मोठी घट

९ ते १४ एप्रिल या कालावधीत शहरात अवकाळी पावसाचेच वातावरण राहणार असून यातील काही दिवशी ढगाळ वातावरण तर काही दिवस पाऊस होण्याचा अंदाज आहे. बदललेल्या स्थितीमुळे शहराच्या तापमानात मात्र घट होणार असल्याने शहरवासीयांना उन्हाचा काहीअंशी कमी होणार असल्याचे चित्र आहे. शहराचे किमान तापमान १८ ते २० अंश सेल्यिसस तर कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सियस राहणार आहे.

ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणाची आत्महत्या ; प्रेयसीच्या विरोधात तक्रार

- Advertisment -

ताज्या बातम्या