Monday, April 29, 2024
Homeब्लॉगBlog : ख्रिसमसचे पर्व

Blog : ख्रिसमसचे पर्व

नाशिक | ख्रिसमसचा उत्सव संपूर्ण विश्वात खूप उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला. त्यांच्या उपदेशाच्या आधारावर इसाई धर्माची सुरुवात झाली. ख्रिसमस पर्वात लोक एकमेकांना प्रेमाने भेटतात, त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा आणि भेटही देतात…

ख्रिसमस पर्वात आपल्याला येशू ख्रिस्तांना जाणण्याची संधी प्राप्त होते. येशू ख्रिस्तांचा मूळ संदेश प्रेमाचा संदेश आहे.

- Advertisement -

प्रभू प्रेम आहे. आपला आत्मा त्यांच्या प्रेमाचा एक किरण आहे. एका बाजूला प्रभू आणि मनुष्यात आणि दुसऱ्या बाजूला मनुष्य आणि प्रभूची सृष्टी यातील एक सूत्र प्रेम आहे. प्रेम जीवन आणि प्रकाशाच्या नियमाची पूर्णता करते.

चला, आपण विचार करूया, आपल्या जीवनात असे प्रेम झळकते का? आपण एकमेकांची प्रेमाने सेवा करतो का? ज्यांचे विचार आपल्यापेक्षा भिन्न आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याशी उदार तसेच सहनशील असतो का?

आपण परमेश्वराच्या सर्व जीवसृष्टीवर प्रेम करतो का? आपण त्या सर्वांना आपले समजून त्यांना जवळ करतो का? दीन-दलित लोकांविषयी आपल्या मनात दया आणि सहानुभूती आहे का?

आपण आजारी तसेच पीडित लोकांसाठी प्रार्थना करतो का? आपण प्रेमाने राहत नसू तर आपण प्रभूपासून दूर आहोत व धर्मापासूनही दूर आहोत. भले मग आपण किती ही मोठ्या-मोठ्या गोष्टी करीत असू दे, भलेही आपण धार्मिक असू दे; हा तर आपल्या या विचारांचा देखावाच करीत असतो.

संतांच्या मनात सर्वांविषयी प्रेम असते. ते लोकांविषयी त्यांचा रंग, राष्ट्र वा धर्माच्या आधारावर कोणामध्येही भेदभाव करीत नाहीत.

त्यांच्यासाठी कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतात. लोकांनी केवळ आपला संदेश न ऐकता त्याप्रमाणे जीवन जगले पाहिजे, अशी येशू ख्रिस्तांची इच्छा होती. बरेच लोक ऐकतात, पण फार थोडे जण ते समजतात. त्यातील पुन्हा फार थोडे ते आचरणात आणतात.

येशू ख्रिस्तांच्या पवित्र जयंतीनिमित्त येशू ख्रिस्तांची शिकवण आपल्या जीवनात आचरणात आणावी. येशू ख्रिस्तांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जीवन जगायला लागलो तर खऱ्या अर्थाने हे ख्रिसमस पर्व साजरे केल्यासारखे होईल.

संत राजिंदर सिंहजी महाराज

- Advertisment -

ताज्या बातम्या