Friday, April 26, 2024
Homeनगरलॉकडाऊन विरोधात कोपरगावात व्यापारी महासंघाचे आंदोलन

लॉकडाऊन विरोधात कोपरगावात व्यापारी महासंघाचे आंदोलन

कोपरगाव (प्रतिनिधी) –

महाराष्ट्र शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे छोट्या दुकानदार व्यापार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या शासनाचे

- Advertisement -

धोरणाचे निषेधार्थ कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने केलेल्या आवाहनानुसार कोपरगाव शहरातील दुकानदारांनी लॉकडाऊनच्या विरोधात घोषणा फलक हातात धरून, सविनय कायदे पालन करत तसेच डोक्याला काळ्या फिती बांधून कोणत्याही प्रकारच्या घोषणा न देता किंवा जमावबंदीचा भंग न करता आपापल्या दुकानासमोर निषेध फलक हातात धरून सविनय कायदे पालन करत अभिनव अशा स्वरूपाचे आंदोलन केले.

या प्रसंगी तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे म्हणाले, शासकीय कर्मचार्‍यांना सेवानिवृत्ती वेतन मिळते, शेतकरी, उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते त्याला आमचा विरोध नाही परंतु छोट्या व्यापार्‍यांना देखील लॉक डाऊन काळात लॉक डाऊन भत्ता सरकारने चालू करावा, मगच आम्हाला दुकाने बंद करण्याचे आदेश द्यावे.

लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करताना महाराष्ट्र शासन मोठे उद्योजक, भांडवलदार, मोठ्या वृत्तपत्रांचे संपादक, चित्रपट निर्माते यांच्याशी चर्चा केली, परंतु छोट्या व्यापार्‍यांना विश्वासात घेतले नाही. गेले वर्षभर छोट्या व्यापार्‍यांची लॉकडाऊन मुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक झळी सोसल्या आहे, आणि आता पुन्हा छोट्या दुकानदारांवर अन्याय करण्याच्या या धोरणाचा आम्ही निषेध करीत आहोत.

तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमारजी बंब म्हणाले, शासनाच्या अजब प्रशासन, गजब निर्णयानुसार सर्वत्र पूर्ण क्षमतेने बस वाहतूक सुरु आहे, तसेच रेल्वे विमानांसारखी आंतरराष्ट्रीय सेवा यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसून सुरु आहे. फक्त छोट्या दुकानादारांनाच शासनाच्या निर्णयाचा फटका बसला आहे. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे नरेंद्र कुर्लेकर, सत्येन मुंदडा, राजकुमार बंब, नारायणशेठ अग्रवाल, चांगदेव शिरोडे, सराफ असोसिएशनचे अध्यक्ष योगेश बागुल, स्टेशनरी असोसिएशनचे रमेश शिरोडे, उल्हास गवारे, निलेश मुंदडा, महावीर सोनी, तिलक अरोरा यांचेसह कोपरगाव व्यापारी समितीचे अकबर शेख व संघर्ष समितीचे अंकुश वाघ, शरद खरात आणि अनेक व्यापारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या