Saturday, April 27, 2024
Homeनगरमर्चंट बँकेसाठी 48.65 टक्के मतदान

मर्चंट बँकेसाठी 48.65 टक्के मतदान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर मर्चंट सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी 17 हजार 508 पैकी 8 हजार 518 (48.65 टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नगर अर्बन बँक व शहर सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या तुलनेत मर्चंट बँकेसाठी अधिक मतदार मतदानासाठी बाहेर पडलेले दिसले. मतमोजणी आज सोमवारी कल्याण रस्त्यावरील अमरज्योत मंगल कार्यालयात सुरू होणार आहे.

- Advertisement -

मतदानासाठी 46 केंद्र होती. त्यातील 37 केंद्र नगर शहरातील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात होती. तेथे जवळपास 24 ते 15 हजारांचे मतदान होते. इतर मतदान केंद्र पुणे, औरंगाबाद, पाथर्डी, श्रीगोंदा येथे होती. मात्र, तुलनेत तेथे कमी मतदान होते. त्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी नगर शहरातील केंद्राधर मोठी गर्दी केली होती. निवडणूक यंत्रणा व बँक व्यवस्थापनाच्या वतीने मतदारांना आधार कार्डाच्या मदतीने मतदानाची स्लिप देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

त्यावर मतदान केंद्राचा क्रमांक होता. पहिल्या दोन तासात, सकाळी 10 वाजता 925, दुपारी बारापर्यंत 3 हजार 18, दुपारी दोनपर्यंत 5 हजार 672 व मतदान संपेपर्यंत 8 हजार 518 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या व्यवस्थेसाठी 368 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवून होते.

मतदानानंतर सर्व मतपेट्या सीलबंद करून कल्याण रस्त्यावरील अमरज्योत मंगल कार्यालयात पोलिस बंदोबस्तात ठेवण्यात आल्या. तेथेच आज सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू केली जाणार आहे. एकाच वेळी 23 टेबलवर मतमोजणी केली जाणार आहे. प्रत्येक टेबलवर पाच कर्मचारी मोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या