Thursday, April 25, 2024
Homeधुळेजीवंत अधिकार्‍यांचे श्राध्द घालून करणार मुंडण

जीवंत अधिकार्‍यांचे श्राध्द घालून करणार मुंडण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

वनविभाग मेंढपाळ ठेलारी समाजास मेंढी चराईसाठी मंजूर केलेली जागा दाखविण्यास टाळाटाळ करीत आहेत. केवळ तोंडी आश्वासन देवून वेळ मारून नेतात. त्यामुळे कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या वनधिकार्‍यांचे दि. 30 रोजी श्राध्द घालून मुंदन आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मेंढपाळ ठेलारी समाज व महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे यांनी पत्रपरिषदेत दिली.

- Advertisement -

यावेळी रामदास कारंडे, गोविंद रूपनर, नाना पउळकर, ज्ञानेश्वर सुळे, समाधान ठोंबरे, रामचंद्र पउळकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात मेंढपाळ ठेलारी समाजाचे वास्तव्य असलेले 168 गावे आहेत. मेंढ्या चारण्यावरून सतत तक्रारी होत असतात.

समाजाला वनविभागामार्फत शासनातर्फे मेंढी चराईसाठी 68 हजार हेक्टर जमीन मंजुर केलेली आहे. परंतू वनविभागाचे अधिकारी ही मंजुर झालेली जमिन समाजास दाखविण्यास टाळाटाळ करतात. मेंढ्या वनात चराईस गेल्यास दंडात्मक कार्यवाही करतात.प्रसंगी गुन्हेही दाखल करतात. त्यामुळे मेंढपाळ शेतीच्या बांधावर मेंढ्यांना चराईला नेल्यास एखादी मेेंढी शेतात घुसल्यास वाद होतात.

त्यामुळे मेंढपाळ त्रस्त झाले आहेत. वन अधिकार्‍यांनी मेंढी चराईची मंजुर झालेली जागा दाखवावी, यासाठी दोन वर्षापासून आंदोलने करण्यात आली. मात्र वनअधिकार्‍यांनी केवळ तोंडी आश्वासन देवून वेळ मारून नेली.

त्यामुळे हे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी वाघमोडे यांनी सांगितले. यानंतरही दखल न घेतल्यास दि. 15 जुलै रोजी वनविभागाच्या कार्यालयांना टाळे ठोकले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या