Tuesday, April 23, 2024
Homeजळगावचाळीसगाव-धुळे पॅसेजरऐवजी मेमू ट्रेन धावणार

चाळीसगाव-धुळे पॅसेजरऐवजी मेमू ट्रेन धावणार

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

- Advertisement -

कोविड मुळे लॉकडाऊनपासून बंद असलेली चाळीसगाव-धुळे पॅसेजर ऐवजी आता येत्या एक ते दोन महिन्यात चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईनवर मेमू ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे चाळीसगाव-धुळे पॅसेजरच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो प्रवाशांना लवकरच मेमू ट्रेनच्या प्रवासाचा सुखद अनुभव घेता येईल. चाळीसगाव- धुळे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील पॅसेजरच्या जागी मेमू ट्रेन सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच मेमू सुरु करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु असल्याची चर्चा देखील रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये आहे.

चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर १५ ऑक्टोंबर १९०९ पासून सुरु असलेली खान्देशाची राणी व चाळीसगाव धुळेकरांसाठी रेल्वे प्रवशांच्या दृष्टीने इग्रजांच्या काळापासून सुरु असलेली चाळीसगाव-धुळे पॅसेजरच्या ऐवजी आता या मार्गावर अत्याधुनिक मेमू रेल्वे सुरु करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनातर्फे सुरु आहे. चाळीसगाव-धुळे पॅसेजर १५ ऑक्टोंबर १९०९ पासून कोळशाच्या इंजिनाव्दारे धावू लागली. पुढे सन १९४५ पासून कोळशाचे इंजिन बंद होऊन ती डिझेलच्या इंजिनाव्दारे धावू लागली.

तर मागील वर्षी मार्च २०२० पासून चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईनवर विद्युतीकरण करण्यात आल्याने ती इलेक्ट्रीक इंजिनवर धावत होती. परंतू मागील वर्षापासून सुरु असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे मार्च महिन्यापासून रेल्वे बंद करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून चाळीसगाव-धुळे पॅसेजर सुरु करण्याची मागणी प्रवशांनी लावून धरली आहे. त्यासंदर्भात चाळीसगाव व धुळे येथील विविध संघनातर्फे निवदेनही देण्यात आली होती.

परंतू अद्यापपर्यंत रेल्वे प्रशासनाकडून पूर्णता; पॅसेजर व इतर रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय झालेला नाही. परंतू २५० कि.मी. अतंरवरील सुरु असलेल्या पॅसेजर गाड्या बंद करुन, त्या ठिकाणी मेमू रेल्वे सुरु करण्याच्या विचारधीन रेल्वे प्रशासन आहे. त्याच धर्तीवर चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईनवर देखील मेमू रेल्वे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. भूसावळ येथे मेमू रेल्वेचे सहा रॅक दाखल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या मार्च किवा एप्रिल महिन्यात चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईनवर मेमू रेल्वे धावतांना दिसणार आहे.

कशी असेल मेमू ट्रेन-

चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यामुळे प्रवशांच्या सोयीसाठी या मार्गावरील पॅसेंजरच्या जागी मेमू सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समझते आहे. पॅसेंजर ट्रेनची वेगमर्यादा सुमारे ७० ते ९० किमी प्रतितास असते. मात्र प्रत्यक्षात पॅसेंजर धावताना सरासरी ५०-६० किमी प्रतितास या वेगाने धावते. मेमूची ताशी ११० ते १३० किमी धावण्याची क्षमता आहे. परंतू प्रत्यक्षात ८० ते ९० किमी प्रतितास चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वेचे नियोजन असते. लोकल प्रमाणाचे मेमूला दोन्ही बाजूने पावर कार इंजिन असते. त्यामुळे एक चालक व एक गार्डची नियुक्ती या ट्र्रेनसाठी करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. चाळीसगाव-धुळे मार्गावर धावणारी मेमू ट्रेन देखील याच पद्धतीची असणार आहे. मेमू ट्रेन चालविण्यासाठी चालकांचे ऑनलाईन प्रशिक्षण देखील सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन विषयी थोडक्यात-

चाळीसगाव-धुळे पॅसेजर प्रमाणेच मेमू ट्रेन सुरुवातीला दिवसातून चार फैर्‍या धावणार आहे. त्यानतंर प्रवशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, फैर्‍या वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. तर मेमू रेल्वे सुरु झाल्यानतंर पुढे भाडे वाढ देखील होऊ शकते. तसेच चाळीसगाव-धुळे पॅसेजरला जे इतर मेल एक्सप्रेसचे एसी कोच जोडले जात होते, ते आत चाळीसगाव-धुळे पॅसेजर बंद होणार असल्यामुळे जोडले जाणार नाहीत. त्यामुळे रेल्वे कर्मचार्‍यांची देखील कमी करण्यात आले असून मेमू ट्रेन सुरु झाल्यावर पुन्हा काही कर्मचारी तिच्या देखभालसाठी नियुक्त केले जाणार असल्याची रेल्वे कर्मचार्‍यांमध्ये चर्चा आहे. तर चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर सुरु होणार्‍या मेमू ट्रेनमध्ये प्रत्येक डब्यात दोन सीसीटीव्ही कॅमेर आहेत. त्यामुळे चोरीचे प्रमाण देखील कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी चाळीसगाव-धुळे पॅसेजरचे इंजिन हे बदलविण्यासाठी वेळ लागत होता. परंतू आता मेमू ट्रेनला दोन्ही बाजूने पॉवर इंचिन असल्यामुळे इंजिन बदविल्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.

प्रवशांच्या सहकार्याची अपेक्षा-

चाळीसगाव-धुळे पॅसेजर ऐवजी आता अत्याधुनिक मेमू ट्रेन धावणार असल्यामुळे प्रवशांना देखील ती भविष्यात बंद होवू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. चाळीसगाव-धुळे पॅसेजरबाबत प्रवशांचा अनुभव फारच वाईट होता. चाळीसगव रेल्वे स्थानकावर सुरुवातीला या पॅसेजरमध्ये फारच घाण केली जात असे. त्यामुळे चाळीसगाव-धुळे पॅसेजरचे शौचालय कायमस्वरुपी बंद करण्यात आले होते. तर चाळीसगाव-धुळे पॅसेजरमध्ये फुकट्या प्रवशांचा वावर बर्‍याच प्रमाणात होता. चाळीसगाव ते धुळे दरम्यान येणार्‍या भोरस रेल्वे स्थानकातून तिकीटांची अल्प प्रमाणात विक्री होते. तर इतर काही स्टेशनवर देखील कमी प्रमाणात तिकीटाची विक्री होते. रेल्वे प्रशानातर्फे अनेक स्थानकांचा सर्व्हे सुरु असून ज्या स्थानकातून कमी प्रमाणात उत्पन्न मिळते, किवा मिळतच नाही असे स्थानक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे भविष्यात जर चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईनवर मेमू ट्रेन सुरु ठेवायची असेल तर प्रवाशांनी प्रामाणिकपणे तिकीट काढुनच प्रवास करावा लागले नाहीतर भविष्यात ही मेमू रेल्वे सुध्दा कमी उत्पन्नामुळे बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासन घेवू शकते. येत्या एक ते दोन महिन्या चाळीसगाव ते धुळे दरम्यान सुरु होणारी मेमू ट्रेन स्वच्छ आणि सुंन्दर ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांची आहे. इग्रजांच्या काळापासून सुरु झालेली ही खान्देशाची राणी भविष्यात देखील बंद होण्याची वेळ येवू नये म्हणून आता प्रवाशांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या