मनमानी कारभारविरोधात निवेदन

चिंचखेड । वार्ताहर | Chinchkhed

चिंचखेड (Chinchkhed) येथील ग्रामविकास अधिकारी (Village Development Officer) आणि काही लोकप्रतिनिधी मनमानी कारभार करत असून याबाबत दिंडोरीचे गटविकास अधिकार्‍यांना (group development officers of Dindori) आदिवासी शक्ती सेनेच्या (Adiwasi Shakti Sena) वतीने निवेदन (memorandum) देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) चिंचखेड गाव हे अनुसूचित जमाती क्षेत्रात येत असल्याने येथे पेसा कायदा लागू आहे. गुरुवार दि. 12 जुलै रोजी यासंदर्भात चिंचखेड येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या (Various Executive Cooperative Societies) सभागृहात पेसा कायद्यांतर्गत विविध समित्या गठीत करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

मात्र या ग्रामसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला. सदर ग्रामसभेत ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत मधील इतर प्रतिनिधी यांनी मनमानी केल्याने ग्रामसभा पूर्ण होऊ शकली नाही. ग्रामसभा तहकूब करण्यात आली. यामुळे पेसासारख्या कायद्याला केराची टोपली दाखवून मनमानी केली जात आहे. ग्रामसभेला सर्व अधिकार असताना अशाप्रकारे काही लोक आदिवासी समिती गठीत करण्यासाठी विरोध दर्शवत आहे.

असा आरोप आदिवासी बांधवान (tribal community) तर्फे गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदन्यात केला आहे.त्यामुळे या संदर्भात आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने गट विकास अधिकारी दिंडोरी यांना निवेदन (memorandum) देण्यात आले आहे. या निवेदनावर माजी पंचायत समिती सदस्य संगीता घिसाडे, सारिका पंढारे, सागर पंढारे, दीपक गवारे, संजय पंढारे, किरण कांबळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांच्या सह्या आहेत.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *