टोईंगवाल्यांची सटकली; भरधाव वाहनाने यु-टर्न घेताना सिग्नलचे लाईटच तोडले

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक |प्रतिनिधी Nashik

टोईंगची गाडी (towing van) आली की, सगळीकडे पळापळ सुरु होते. वाहतूक पोलिसाने (Traffic Police) इशारा देताच ठेकेदाराची मानसं नो पार्किंगमध्ये (No Parking) असलेली वाहने उचलून गाडीत टाकतात. यामुळे अनेकदा वादही होताना दिसून आले आहेत….

असेच एक टोईंगचे वाहन सीबीएस परिसरातील (CBS) वाहने आपल्या गाडीत घालून आणल्यानंतर पुन्हा विरुद्ध दिशेची नो पार्किंगमधील (No Parking) वाहने उचलण्यासाठी जात होते. भरधाव असलेल्या या टोईंगच्या वाहनाच्या चालकाचा मेहेर सिग्नलवर यु-टर्न (U Turn at Meher Signal Nashik) घेताना ताबा सुटला अन गाडीच्या एका भागाने सिग्नलच्या लाईटला धक्का दिला.

यांनतर हे लाईट लटकलेले असल्याने खाली पडले नाही. सुदैवाने या घटनेत अनर्थ टळला आणि लाईटचे नुकसानदेखील झाले नाही.

नंतर या गाडीतील काही ठेकेदाराची मंडळी उतरली आणि त्यांनी हे लाईट पुन्हा होते तिथे लावण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी गाडीतले वाहतूक पोलीसदेखील खाली आल्यानंतर त्यांनी लाईट कसे जोडावे याबबत मार्गदर्शन केले.

यावेळी काहीशी वाहतूक कोंडी झाली होती. सिग्नलच तुटल्यामुळे अनेक वाहनधारकांनी वाहने मार्ग रिकामा दिसेल तशी घातली. यामुळे वाहतूक कोंडीत आणखीन भर पडली. झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे अनेकांनी टोईंगवाल्यांवर चांगलाच रोष व्यक्त केला.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *