Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामध्य रेल्वेचा आजपासून मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेचा आजपासून मेगा ब्लॉक

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मध्य रेल्वेच्या ( Central Railway ) टिटोली यार्डात रेल्वे प्रशासनकडून 28 मे ते 1 जून या पाच दिवसांच्या दरम्यान तांत्रिक काम ( Technical Work )हाती घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

मेगाब्लॉकच्या ( Mega Block )काळात नाशिकरोड रेल्वे स्थानकातून मुंबईला जाणार्‍या मेल, एक्स्प्रेस नियंत्रित करून चालवण्यात येणार असल्याने त्या एक ते दोन तास उशिराने धावतील. तर मुंबईहुन नाशिककडे जाणार्‍या लांब पल्ल्याच्या मेल व एक्स्प्रेस नाशिकरोडपर्यंत एक ते दोन तास उशिराने धावतील.

मेगाब्लॉकच्या काळात 152 ट्रेन विस्कळीत होऊन याचा परिणाम रेल्वेच्या वेळा पत्रकावर होणार असल्याने याचा फटका प्रवासी व चाकरमान्यांना बसणार आहे.

मेगाब्लॉकच्या कालावधीत गोदावरी स्पेशल,जनशताब्दी एक्स्प्रेस रद्द केली जाईल. भुसावळ ते इगतपुरी स्टेशन दरम्यान धावणारी मेमु गाडी इगतपुरी पर्यंत न येता नाशिकरोड स्टेशन पर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. त्यामुळे चार दिवस चाकरमाने, विद्यार्थी आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या