Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनवीन औद्योगिक वसाहतीसाठी बैठक

नवीन औद्योगिक वसाहतीसाठी बैठक

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

देवळाली विधानसभा मतदारसंघातील शिंदे, पळसे, विल्होळी येथील नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी या गावांचा ग्राउंड रिपोर्ट व सर्व्हे तातडीने करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश उद्योग राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्याने आ.सरोज अहिरे यांच्या मागणीस यश प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

आ. सरोज आहिरे यांनी केलेल्या मागणीनुसार आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मतदारसंघातील हे तीनही गावे औद्योगिक वसाहतीच्या कार्यक्षेत्रात येतात. या वसाहतीमध्ये विविध अडचणी होत्या. आता लवकरच या अडचणी सुटणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी उद्योग वाढणार आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग विकासाला चालना मिळण्यासाठी आ.अहिरे आग्रही होत्या.

बैठकीस आ. आहिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, नाशिक सह आयुक्त वर्षा मिना, उद्योग विभागाचे सह सचिव संजय देगावकर, प्रादेशिक अधिकारी, नाशिक, नितीन गवळी, मुख्य अभियंता, नाशिक बोरसे, अधीक्षक अभियंता एस.एस. अकुलवार आदी उपस्थित होते.

महामंडळाच्या धोरणानुसार नवीन औद्योगिक वसाहत स्थापण्यासाठी आवश्यक तो पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सोयीसाठी रस्ते, जागेची स्थिती या पायाभूत बाबींचे सर्वेक्षण करावा. प्राप्त अहवालनुसार या परिसरातील लागवडीखालील क्षेत्र आणि स्थानिकांचा प्रतिसाद यावरुन पुढील कार्यवाही करण्याबाबतचे निर्देश राज्यमंत्री तटकरे यांनी संबंधितांना दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या