Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअमरिशभाई पटेल यांना निवडून आणण्याचा निर्धार

अमरिशभाई पटेल यांना निवडून आणण्याचा निर्धार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

विधान परिषदेच्या निवडणुकीत आजपावेतोच्या सर्व विजयांचे रेकॉर्ड तोडीत मोठ्या मताधिक्क्याने अमरिशभाई पटेल निवडून येतील,

- Advertisement -

असा विश्वास भाजपाचे सर्व नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य यांनी आ. गिरीश महाजन यांना दिला. जि.प., मनपासारखा विश्वास सार्थ ठरविण्याचा निर्धार करण्यात आला.

या संदर्भात आज राम पॅलेस येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापौर चंद्रकांत सोनार, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी सभापती सुनील बैसाणे, गटनेत्या वालीबेन मंडोरे, महिला बालकल्याण सभापती स्नेहल जाधव यांचेसह सर्व नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी आ. गिरीश महाजन म्हणाले, जसे मनपा व जिल्हा परिषदमध्ये मतदारांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपणास प्रचंड बहुमताने निवडून दिले आहे तसाच विश्वास आपण सार्थ ठरवीत अमरिशभाईंना प्रचंड मतांनी विधान परिषदेवर निवडून देऊन दाखविला पाहिजे.

अमरिशभाईं सारखे विकासाची दूरदृष्टी असणारे नेतृत्व आपल्याकडे आल्याने जिल्ह्यात विकासाच्या कामात अधिक गती मिळणार आहे.

अनुप अग्रवाल यांनीही मनपाच्या ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती आपणास करावयाची आहे व आ. महाजन यांना दिलेला शब्द आपणास प्रत्यक्षात साकारायचा आहे, असे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या