Friday, April 26, 2024
Homeब्लॉगगुरुपौर्णिमा विशेष : मीना खोंड यांचा ब्लॉग

गुरुपौर्णिमा विशेष : मीना खोंड यांचा ब्लॉग

गुरु परमात्मा परमेशु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु: गुरुर्देवो महेश्वर:। गुरुर्साक्षात परब्रम्हः तस्मैन श्री गुरुवे नमः॥

ब्रह्मा, विष्णू, आणि महेश्वर पेक्षा श्रेष्ठ व महान गुरुचे स्थानं आहे. ‘ गुरु अंधकार दूर करणारा” सत्याचा मार्ग दाखवणारा, दुष्प्रवृत्तीचा नाश करुन सत्प्रृत्तिकडे ज्ञान देणारा मार्गदर्शक आहे. आयुष्याला योग्यप्रकारे वळण देऊन उच्च उत्तम उदात्त उन्नत असे शिष्याचे व्यक्तीमत्व घडवित असतो.

- Advertisement -

गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप. आषाढ शुद्ध पौर्णिमेला महामुनी व्यासाचा जन्म झाला. आपण गुरुच्या गौरवाप्रित्यर्थ गुरुपौर्णिमा साजरी करतो.गुरूपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात. महर्षी व्यासांंचे महाभारत ,अठरापुराणे,श्रीमद्भागवत ,वेदांचा विस्तार इ साहित्यामध्ये महान अलौकिक योगदान आहे. व्यास हे आद्य गुरु आहेत. पूर्वीच्या काळी शिष्य गुरूकडे आश्रमात राहत असत.

राजपुत्र देखिल गुरूगृही राहत असून ज्ञानसंपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे. गुरुचा आणि गुरुमातेचा आदर राखून त्यांचे आज्ञापालन करावे लागत असे.ज्ञानप्राप्तीनंतर गुरूला गुरूदक्षिणा देण्यासाठी गुरूपौर्णिमा साजरी केली जात असे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. गुरु आणि शिष्य यांच्या नात्यातून कृतज्ञ भावातून गुरु पौर्णिमा साजरी होते.काही गुरुशिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहे.

गुरुगृही जाऊन ज्ञान ग्रहण करीत असत.अगदी राम, कृष्ण यांनी गुरुगृही राहून ज्ञान ग्रहण केले. गुरुशिष्यांच्या काही आदर्श जोड्या युगानुयुगापासून प्रसिद्ध आहेत.वसिष्ठ -राम, सांदिपनी -कृष्ण, द्रोणाचार्य -अर्जून,बलराम-दुर्योधन, रामकृष्ण परमहंस-विवेकानंद ,धौम्य ऋषी-आरुणी !गुरुकडे गेल्यामुळे शिष्य लीन होतो नतमस्तक होतो.

अभिमानशुन्य होतो.शिस्तप्रिय होतो. त्यामुळे राजकुमार सुद्धा गुरुगृही राहून सर्व सामान्याबरोबर सामान्यासारखे रहायचे. गुरु आणि गुरुमाता यांचा आदर राखून शिष्य आज्ञापालन करायचे.

त्यामुळे’ उच्च, उत्तम, उदात्त ,उन्नत संस्कार आणि जीवनतत्व सहज अंगिकारल्या जात होते.शिष्यांच्या जीवनात गुरुश्रद्धा महान होती. एकदा दशरथ राजाकडे विश्वामित्राकडे ऋषी आले आणि सांगितले “राजन तुझा ज्येष्ठपुत्र राम याला यज्ञरक्षणाकरिता माझ्याबरोबर पाठव .” आपला लाडक्या पुत्र रामाला यज्ञ रक्षणाकरिता विश्वामित्र ऋषीबरोबर पाठविण्याची दशरथ राजाची इच्छा नव्हती.

पण वसिष्ठ गुरुंनी रामाला विश्वामित्र ऋषींबरोबर पाठविण्यात हित आहे.त्याला पाठव असा सल्ला दिला. रामांनी विश्वामित्रांची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि ते यज्ञरक्षणाकरिता त्यांच्याबरोबर गेले.गुरु दीपस्तंभासारखा असतो.आधारस्तंभ असतो. महर्षी सांदिपनी हे भगवान श्रीकृष्णांचे गुरु होते.

कृष्ण आणि बलराम हे दोघे बंधू शिक्षण घेण्यासाठी सांदिपनी ऋषींच्या आश्रमात आले. महर्षी सांदिपनी यांनी कृष्णाला ६४ कलांचे शिक्षण दिले होते. कृष्णाने या कला ६४ दिवसांत शिकल्या होत्या.शिक्षण झाल्यावर जेव्हा गुरूदक्षिणेची वेळ आली तेव्हा सांदिपनी म्हणाले की कृष्णा मी तुझ्याकडे काय मागू?

या जगात असे काहीही नाही जे मी तुझ्याकडे मागितल्यावर तू मला आणून देऊ शकणार नाहीस. कृष्ण म्हणाला की तुम्ही माझ्याकडे काहीही मागा, मी तुम्हाला आणून देईन. तेव्हाच गुरुदक्षिणा पूर्ण होईल.

गुरु सांदिपनी म्हणाले की शंखासूर नावाचा एक दैत्य माझ्या पुत्राला घेऊन गेला आहे. त्याला परत आणून दे. कृष्णाने गुरुना त्यांचा पुत्र परत घेऊन येण्याचे वचन दिले आणि बलराम सोबत पुत्राला शोधायला निघाला. शोध घेत ते समुद्र किनाऱ्यावर आले असता त्यांना माहिती मिळाली एक दैत्य शंखाचे रूप घेऊन समुद्रात लपला आहे. कदाचित त्यानेच गुरुपुत्राला खाल्ले असेल. कृष्णाने समुद्रात जाऊन शंखासूराला मारून त्याच्या पोटात गुरुपुत्राचा शोध घेतला, परंतु तो तिथे मिळाला नाही.

तेव्हा कृष्ण शंखासुराच्या शरीराचा शंख घेऊन यम लोकात गेला. यमाकडून आपला गुरुपुत्र परत घेतला आणि संदिपनीना परत नेऊन दिला आणि आपली गुरुदक्षिणा पूर्ण केली.धन्य तो शिष्य भगवान श्रीकृष्ण! एके दिवशी द्रोण आणि त्याचे विद्यार्थी जंगलात बाहेर जात असताना, कुत्रा भुंकत होता.

क्षणात कुत्र्याच्या तोंडाभोवती निर्माण झालेल्या बाणांच्या आश्चर्यकारक बाणांमुळे विनाइजा भुंकणे थांबले . द्रोण आश्चर्यचकित झाले . एवढा मोठा धनुर्धर कोण असू शकतो याचा विचार करून द्रोण आणि त्याच्या विद्यार्थ्यांनी तपास केला आणि एकलव्याकडे आले. द्रोणाला पाहून एकलव्य आला आणि त्याला दंडवत घातला. द्रोणाने एकलव्याला विचारले, “तू धनुर्विद्या कुठे शिकलास?” एकलव्याने उत्तर दिले, “तुमच्याकडून ” असे सांगून स्वहस्ते बनविलेली गुरु द्रोणांची मूर्ती त्यांना दाखवली . द्रोणांनी गुरुच्या नात्याने एकलव्याला एकलव्याला गुरू दक्षिणा द्यावी मागितली.

लगेच, एकलव्याने ‘काय गुरुदक्षिणा देऊ ‘ विचारताच द्रोणांनी12:37 PMएकलव्याला गुरू दक्षिण म्हणून त्याता उजवा अंगठा कापून देण्यास सांगितले. आनंदाने हसत मुखाने एकलव्याने त्याचा उजवा अंगठा कापून द्रोणाचार्यांना गुरुदक्षिणेच्या रुपात दिला.गुरुश्रद्धा महान आहे. धौम्य नावाचे एक ऋषी होते. आरुणी हा त्यांचा आज्ञाकारी प्रिय शिष्य होता. पूर्वी गुरू आपल्या शिष्याकडून काम करून घेत असत. त्यांची सत्त्वपरीक्षा घेत असत.शिष्य परीक्षेत यशस्वीपणे उतरत असत.गुरुंचा त्यांना आशीर्वाद मिळत असे. एके दिवशी धौम्य ऋषी आरुणीला म्हणाले, वत्स शेतात जाऊन पावसाचे पाणी तेथील शेतात शिरले का बघ.

तेव्हा गुरूची आज्ञा मिळताच आरुणी धावतच शेतात गेला. शेताजवळील बांध थोडा फुटला होता.त्याने मोठमोठे दगड आणून माती टाकून बांध घातला. परंतू पाण्यामुळे दगड माती वाहून जावू लागले. आता आपण स्वत:च या पाण्यात आडवे पडून पाणी अडवावे असा निर्धार करुन तो तेथे आडवा पडून राहिला. अजून आरुणी परत आला नाही म्हणून धौम्य ऋषी स्वत: शेताकडे गेले. आरुणी त्याना दिसेना. त्त्यांनी अरुणीला प्रेमाने मोठ्याने हाका मारल्या, ‘आरुणी तू कोठे आहेत.

धौम्य ऋषींचे शब्द कानावर पडताच आरुणी तेथून उठला, पुढे येऊन त्याने गुरूंना वंदन केले. धौम्य ऋषींनी त्याला जवळ घेतले आणि त्याच वेळी त्याला वर दिला, ‘तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत,’ असे ऋषी म्हणताच त्याच क्षणी तो विद्यावंत व ज्ञानी झाला. आरुणीने भक्तीभावाने आपले मस्तक गुरूंच्या चरणावर ठेवले.“गुरु म्हणजे उन्हातील सावली गुरु म्हणजे साक्षात माऊली.” आजच्या युगात गुरुची जागा शिक्षकांनी घेतली.शिक्षकांची ओळख प्राथमिक शाळेत होते .लहान निरागस मुलांना शिक्षक शिकवतात.मातीच्या गोळ्याप्रमाणे विद्यार्थांच्या जीवनाला आकार देतात.

पुढे माध्यमिक शाळेत शिक्षकांच्या मार्गदर्शनाने व्यक्तीमत्व फुलारते. जीवनात प्रथम गुरु माता असते.ती बोलायला, चालायला शिकवते.संस्कार संस्कृतीचे आई बाळकडू देते.आईमुळे मुलांना चांगल्या सवयी लागतात.मुलांना आईमुळे जीवनात सद्विचार सदाचाराचे धडे मिळतात. बर्‍याच कुटुंबियांकडे परंपरागत गुरु असतात. त्यांची गुरुवर अपार श्रद्धा असते.आजकाल सच्चा गुरु मिळणे कठिण आहे बरेच भाविक गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ,श्री गजानन महाराज,शिरडी साईबाबा,गोंदवलेकर महाराज यांना गुरु मानतात.त्यांची गुरुश्रद्धा अढळ असते.गुरुश्रद्धेमुळे जीवन जगण्याचे नैतिक बळ मिळते.आत्मश्रद्धा दृढ होते.ईशश्रद्धा , गुरुश्रद्धा आणि आत्मश्रद्धा यामुळे जीवन विकास होऊन उर्जायुक्त तेजस जगण्यास मदत होते. कोणता मानू गुरु? हा प्रश्न जीवनात असतो.

काही लोक पुस्तकांना गुरू मानतात.पुस्तक ज्ञान देतात .विचार देतात.संस्कार देतात.पुस्तक मार्गदर्शक आहेत.पुस्तक गुरु आहेत. ‘कृष्णं वंदे जगद्गुरु ‘। सार्‍या विश्वाला भगवद्गीता सांगणारा भगवान श्रीकृष्ण हा जगद्गुरू आहे. महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला.

ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे.आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो त्याच विद्येच्या बळावर आपण आपल्या जीवनाचा कुटुंबाचा समाजाचा उद्धार करतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय!

मीना खोंड, लंडन 7799564212

- Advertisment -

ताज्या बातम्या