Tuesday, April 23, 2024
Homeनगरमेडिकल दुकानाचे कुलूप तोडून 1 लाख 35 हजारांची रोकड लांबविली

मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून 1 लाख 35 हजारांची रोकड लांबविली

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरातील बस स्थानका समोर सप्तर्षी मळ्यात असलेल्या साई समृद्धी मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून परप्रांतीय आरोपी

- Advertisement -

किसन लडकीया बारेला रा.अडावद, ता.यावल, जि.जळगाव व राजेश चांदीया बारेला रा.वजापूर, ता. शेंधवा ,जिल्हा बडवानी व गुड्डा या तिघांनी दुकानांचे कुलूप तोडून त्यातील 1 लाख 35 हजार 600 रुपयांची रोख रकमेची चोरी केल्याचा गुन्हा फिर्यादी संजय शंकर वाणी रा.सप्तर्षी मळा यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

याच आरोपींनी आणखी श्रीराम मंदिर रोडवरील रहिवाशी व अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ प्रकाश एजन्सी असलेले इलेक्ट्रीक दुकान फोडून त्यातील 10 हजार रुपये किमतीचा टॅब असा एकूण 01 लाख 45 हजार 600 रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना गुरूवारी घडली आहे.

कोपरगाव शहरात बस स्थानकासमोर संजय शंकर वाणी यांचे साई समृद्धी नावाचे मेडिकल दुकान असून त्यांनी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले असता रात्री तीन वाजेच्या सुमारास आरोपी किसन लडकीया बारेला रा.अडावद, ता. यावल, जि. जळगाव व राजेश चांदीया बारेला, रा.वजापूर, ता. शेंधवा, जिल्हा बडवानी व गुड्डा या तीन आरोपीनी दुकानाजवळ कोणी नाही ही संधी साधत दुकानाचे कुलूप तोडून त्यातील 1 लाख 35 हजार 600 रुपये रोख घेऊन पोबारा केला आहे.

त्यानंतर त्यांनी राममंदिर रोडला रहिवाशी असलेल्या फिर्यादी हरेश मोहनदास कराचीवाला यांचे अण्णाभाऊ साठे पुतळ्याच्या वायव्येस शंभर फुटावर असलेले प्रकाश एजन्सी नावाचे दुकानात घुसून काळ्या रंगाचा 10 हजार रुपये किमतीचा टॅब घेऊन नजीकचे नागरिक जागे झाल्याने व त्यांनी आरडाओरडा केल्याने पोबारा केला आहे.

त्यानंतर ते सुभाषनगर परिसरात पळून जात असताना नागरिकांना आढळून आल्याने त्याना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी फिर्यादी संजय वाणी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि.कलम .457, 380 प्रमाणे तर दुसरा फिर्यादी हरेश कराचीवाला यांच्या फिर्यादीवरून भा.दं.वि.कलम 457,380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या