बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने मेकॅनिकचा मृत्यू

jalgaon-digital
1 Min Read

जळगाव- Jalgaon

बाथरूम (bathroom) मध्ये पाय घसरून पडल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन रुपेश प्रभाकर मोरे (वय-४२, रा.हॅप्पी होम कॉलनी, अयोध्या नगर) या मेकॅनिकचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शहरातील अयोध्या नगरातील हॅप्पी होम कॉलनीत रुपेश मोरे हे वास्तव्यास असून ते बाथरुममध्ये (bathroom) पाय घसरुन पडल्याने डोक्याला मार इंजिनिअरींग दुकानात मेकॅनिकचे काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी पहाटे पाच वाजता उठल्यानंतर ते घराच्या मागील बाजूस असलेल्या बाथरुममध्ये गेले होते. तेथून परत येत असताना बाथरुममध्ये बाहेर पाय घसरुन पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांच्या पत्नी मनिषा या सकाळी सहा वाजता उठून बाथरुमला (bathroom) जात असताना त्यांना पती रुपेश हे जमिनीवर बेशुध्दावस्थेत पडलेले दिसून आले. त्यांनी घराजावळील नागरिकांच्या मदतीने त्यांना शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करीत त्यांना मयत घोषित केले.

भावाच्या मुलीला घेतले दत्तक

रुपेश यांना मुलबाळ नसल्याने त्यांनी आपल्या भावाच्या मुलीला दत्तक घेतले होती. परंतु काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई इंदूबाई, पत्नी मनिषा, मुलगी चिऊ, भाऊ मुकेश व अतुल असा परिवार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *