Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशविमान प्रवाशांसाठी जेवणाची सुविधा

विमान प्रवाशांसाठी जेवणाची सुविधा

नवी दिल्ली | New Delhi –

विमानात प्रवाशांना लवकरच शाकाहारी तसेच मांसाहारी जेवण आणि विविध फराळी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

- Advertisement -

नागरी उड्डयन मंत्रालयाने याबाबत विशेष कार्यपद्धती (एसओपी) जाहीर केली आहे.

करोना टाळेबंदीमुळे बंद केलेली विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. मंत्रालयाच्या वतीने घरगुती आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी दोन वेगवेगळ्या विशेष कार्यपद्धती अर्थात एसओपी जाहीर करण्यात आल्या आहेत. घरगुती उड्डाणातील प्रवासादरम्यान जेवण, फराळी पदार्थ, विविध पेये तसेच, आंतरराष्ट्रीय प्रवासात गरम जेवण उपलब्ध होणार आहे. याशिवाय दोन प्रकारच्या प्रवासात संगीताचा आस्वाद घेता येईल. यासाठी मंत्रालयाने विशेष परवानगी दिली आहे. Ministry of Civil Aviation (MCA)

देशांतर्गत उड्डाणांसाठी आतापर्यंत प्रवासात जेवण मिळू शकत नव्हते. पाण्याची बॉटल दिली जायची. आता खाण्यापिण्याच्या वस्तू एकदाच वापरता येणार्‍या प्लॅस्टिक ग्लासमध्ये मिळतील. क्रू मेंबर्सना प्रवाशांना जेवणादी पदार्थ दिल्यावर प्रत्येकवेळी हातमोजे बदलावे लागतील. भ्रमणध्वनी आणि त्याच्या उपयोगासाठी वापरण्यात येणार्‍या अन्य साहित्यांचे (इयर बर्ड्स, हेडफोन) निर्जंतुकीकरण करावे लागेल. मुखाच्छादन आणि चेहराच्छादन वापरण्यास नकार देणार्‍या प्रवाशांवर विमानप्रवासासंबंधी कायमची बंदी घातली जाईल, असे नागरी विमान महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या