एमबीए सीईटी परीक्षा : सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

आशिष पाटील

भुसावळ Bhusawal।

पालकांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी (students) एमबीए शिक्षणासाठीच्या (MBA CET Exam) सीईटी परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात परीश्रम घेतले. विविध क्लासेससाठी मोठा खर्च ही केला. मात्र ऐन परीक्षा सुरु असतांनाच सर्व्हर डाऊन (Server down) झाल्यामुळे परीक्षा पूर्ण (exam not completed) होऊ शकली नाही. तसेच आपली कुठलीच चुकी नसल्याने आपले भविष्य अधांतरीच राहिल्याचे पाहुन परीक्षार्थी सैरभैर झाले.

एमबीए शिक्षणासाठी आवश्यक असणार्‍या सीईटी परीक्षेसाठी आठ महिन्यापासून रक्ताचे पाणी करुन अभ्यास केला मात्र ऐन परीक्षेच्या वेळी ऑनलाईन सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षार्थ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यामुळे आठ महिने अभ्यास करुन भवितव्य अंधारात जात असल्याच्या भितीमुळे अनेक विद्यार्थी सैरभैर झाले. यावेळी परीक्षा केंद्रावरील निरीक्षकांनी ही वेळ वाढवून मिळणार असल्याचे परीक्षार्थींना सांगितले मात्र तसे झाले नाही त्यामुळे विद्यार्थांना परीक्षा मंडळाकडून अपेक्षा आहे.

राज्यात एमबीएच्या सीईटी परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी पालकांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महागडे क्लासेस लावले आठ महिने परीश्रम घेतले. अखेर 25 रोजी सकाळी 9 ते 11.30 वाजेदरम्यान सीईटीची परीक्षा होणार असल्याने परीक्षार्थी आपापल्या परीक्षा केंद्रांवर दाखल झाले. निर्धारीत वेळेत परीक्षा सुरु झाली, मात्र परीक्षा सुरु असतांना सकाळी 11.02 वा. अचानक सर्व्हर डाऊन झाले.

त्यामुळे विद्यार्थी व परीक्षा केंद्रांवरील परीक्षकांना नेमके काय करावे हे समजत नव्हते. अशा काळात तब्बल 28 मिनिटे सर्व्हरचा गोंधळ चालला. यानंतर सर्व्हर पुन्हा सुरु झाले. त्यामुळे विद्यार्थांचा परीक्षा काळातील तब्बल 28 मिनीटे म्हणजे अर्धा तास वाया गेला. त्यामुळे आठ महिने अभ्यास व क्लासेसचा मोठा खर्च करुनही उपयोग होणार नसल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

अडीच तासात 200 मार्कांची परीक्षा होणार होती. मात्र परिक्षेचा शेवटच्या अर्धा तास (28 मिनीटे) हा परीक्षार्थिंसाठी निर्णायक व महत्वपूर्ण असतो अशा वेळेतच सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचा मात्र गोंधळ उडाला. परीक्षार्थींची भिती लक्षात घेता परीक्षा मंडळ व स्थानिक लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *