Thursday, April 25, 2024
Homeजळगावमाझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हेक्षणाची जबाबदारी शिक्षकांवर

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

महानगरपालिका जळगावतर्फे माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्व्हेक्षण मोहिमेंतर्गत शहरात ठिकठिकाणी कोविड संशयित रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

यात प्रत्येक वार्डात एक शिक्षक व आशा वर्कर अशा दोन जणांवर 700 ते 800 कुटुंबांचे सर्व्हेक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेने टाकली आहे.

या संदर्भात शिक्षकांना येणार्‍या अडचणीं विषयी आयुक्त सतिश कुलकर्णी यांची भेट घेऊन त्या संदर्भात चर्चा केली. त्यात आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, असे जळगाव तालुका खासगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे तालुका उपाध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.

जळगाव शहरात प्रत्येक टीमला शिक्षकांसोबत आशा वर्कर देवून नागरिकांचे ऑक्सिजन लेव्हल, तापमान अशी तपासणी करण्यात येत असून प्रत्येक टीमला सातशे ते आठशे घरांचे सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे.

जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपले काम संपेल.सर्वेक्षणाचे योग्य रीतीने नियोजन व्हावे. दिलेला एरिया, घरे यांचे नीट नियोजन करून शिक्षकांना व्यवस्थित सूचना द्याव्यात, असे आयुक्तांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनाही सूचना दिल्या आहेत.

या सर्वेक्षणाचे कोणतेही अतिरिक्त मानधन मिळणार नाही..सर्वेक्षणाचे कर्तव्य करत असताना दुर्दैवाने काही अनुचित प्रसंग शिक्षकांवर ओढवल्यास या संदर्भात करोना योद्धे म्हणून त्यांना योग्य ती विमा सुरक्षा शासन नियमानुसार मिळेल,असे आयुक्तांनी शिक्षकांना आश्वासित केले.

सर्वेक्षण करणार्‍या शिक्षकांना लसीकरण व्हावे याबाबत आयुक्तांनी सकारात्मक आहेत.लसींचा साठा उपलब्ध झाल्यावर शिक्षकांना प्राधान्याने लस देण्यात येईल,अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. जागतिक महामारी असल्यामुळे भारताला आज आपल्यासारख्या शिक्षकांची गरज आहे. त्यामुळे या राष्ट्रीय आपत्तीत आपण सर्व शिक्षकांनी माझे कुटूंब माझी जबाबदारी सर्वेक्षण काळजी पूर्वक करून स्वत:ची काळजी घेऊन कोविड विषयक शासन नियम पाळून काम करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या