Thursday, April 25, 2024
Homeनगरमहापौर निवडणूक : भाऊंच्या पुढाकारातून शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली उध्दव ठाकरे यांची भेट

महापौर निवडणूक : भाऊंच्या पुढाकारातून शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली उध्दव ठाकरे यांची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापौर पदाची आस लागून असलेल्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. स्थानिक नगसेवकांना लागलेल्या महापौर पदाच्या आशेला मुंबईत संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांनी धक्का दिल्याने शिवसैनिकांचे मनोबल वाढले आहे.

महापौर पदासाठी इच्छुक असलेले रोहिणी शेंडगे यांचे मिस्टर संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे हे मोजके नेते दोन दिवस मुंबईत तळ ठोकून होते. पक्षाचे सचिव अनिल देसाई यांच्याशी बैठक घेत त्यांच्या कानावर नगरचे राजकारण आणि महापौर पदाचे गणित मांडले. त्यांनतर हे शिष्टमंडळ पक्षप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या धक्क्याने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यापर्यंत पोहचले.

- Advertisement -

जून अखेरीला विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे (भाजप) यांची मुदत संपत आहे. त्यापूर्वी नव्या महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. महापौर पद हे अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव आहे. शिवसेनेकडे रोहिणी शेंडगे, रिता भाकरे, कॉँग्रेसकडे शीला दीप चव्हाण, राष्टवादीकडे रुपाली पारगे हेउमेदवार आहेत. यातील शिवसेनेच्या शेंडगे यांनी महापौर पदाच्या खुर्चीसाठी फिल्डींग लावली आहे. त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. राष्ट्रवादीला सोबत घेतल्याशिवाय नगरला शिवसेनेचा महापौर शक्य नाही, असे सांगतानाच संख्याबळाचे गणितही मांडताना शिष्टमंडळाने राष्ट्रवादीसोबत घेण्याची व्यूहनिती आखली.

जुने जाऊ द्या मरणालागुनी

भाऊ कोरगावकर यांनी संपर्कप्रमुख या नात्याने नगर महापालिका शिवसेनेच्या ताब्यात घेण्यासाठी रणनिती आखली आहे. त्यांच्याच पुढाकारातून शिवसेनेचे नगरसेवक ठाकरे यांच्या भेटीला पोहचू शकले. जुने प्रकरणं उगळत बसली तर शिवसेनेला सत्तेपासून दूर रहावे लागेल, ही बाब हेरून भाऊंनी राष्ट्रवादीशी सूत जुळवून घेण्याला प्राधान्य दिल्याचे समजते. जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळून किंवा पुसून टाका…या केशवसुतांनी ओळीनुसार कोरगावकर हे शिवसेनेत ‘जान’ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हीच बाब राठोड समर्थक नगरसेवकांना मान्य नाही. त्यामुळे शिवसेनेंतर्गत असलेला विरोधाचा वाद कसा मिटेल याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

राठोड समर्थक नाराज

मुंबईच्या बैठकीला निवडक स्थानिक नेते गेले. त्या बैठकीपासून राठोड समर्थकांना दूर ठेवले गेले. ही सल राठोड समर्थक नगरसेवकांना बोचली आहे. बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, दत्ता जाधव, संजय गेनप्पा, अशोक बडे, परेश लोखंडे, सप्रे यांना बैठकीपासून दूर ठेवले. महापौर पदासाठी लायबल असणारे रिता भाकरे यांना अंधारात ठेवून मुंबईची मिटिंग-सेटींग झाली. त्यामुळे राठोड समर्थकांनी आज शुक्रवारी रात्री ‘भोजनावळ बैठक’ बोलविली आहे. या बैठकीत पुढची रणनिती ठरली जाईल, असे सूत्रांकडून समजले.

- Advertisment -

ताज्या बातम्या