Saturday, May 4, 2024
Homeनाशिकनाशिकचे महापौर करोनामुक्त

नाशिकचे महापौर करोनामुक्त

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशिक शहराचे प्रथम नागरिक तथा महापौर सतीश कुलकर्णी यांनी करोनावर यशस्वीरित्या मात करून आज सह्याद्री हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला.नाशिक शहरात पहिला रुग्ण आढळला अगदी त्या क्षणापासून ते स्वतःला करोना संसर्ग होऊन त्यामधून मुक्त होईपर्यंत अत्यंत सक्षम पणे व तेवढ्याच धीराने परिस्थिती हाताळून पुन्हा करोनाच्या रणांगणात उतरले आहेत.

- Advertisement -

महापौर सतीश कुलकर्णी हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना शांत बसणे त्यांचा उपजत स्वभाव नसल्याने त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलमधून दूरध्वनीद्वारे आपले कामकाज सुरूच ठेवले.

सह्याद्री हॉस्पिटलचे डॉक्टर देवदत्त चाफेकर, डॉक्टर दिनेश वाघ यांच्या अथक प्रयत्नातून व स्वतःच्या मानसिकतेने आणि योग प्राणायाम याच्या जोरावर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आपल्या वयोमानाला मागे सारून कोरोना संसर्गावर यशस्वीपणे मात केली व डॉक्टरांच्या नियमानुसार काही दिवस विलगीकरनात राहून पुन्हा पुढच्या आठवड्यात सक्षमपणे करोनाच्या रणांगणात उतरणार आहे. त्यादरम्यान ते आपले सर्व कामकाज सोशल मीडिया व दूरध्वनीद्वारे अविरत चालू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या