Friday, April 26, 2024
Homeनगरउपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे स्पर्धेत

उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून गणेश भोसले, विनीत पाऊलबुद्धे स्पर्धेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर महानगर पालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) महापौर निवडणुकीसंदर्भात (Mayor Election) शनिवारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची(NCP Corporators) बैठक झाली. या बैठकीत उपमहापौर पदासाठी विनीत पाऊलबुद्धे (Vineet Paulbuddhe) आणि गणेश भोसले (Ganesh Bhosale) यांच्या नावाची शिफारस आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. आ. जगताप यांच्या सोबत आज (रविवारी) नगरसेवकांची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय घ्याला घेतला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

30 जून रोजी विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे (Mayor Babasaheb Wakale) यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. महापौर (Mayor) पद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. गत आठवड्यात मुंबईमध्ये शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी (NCP) एकत्र निवडणूक(Election) लढण्याचा निर्णय झाला. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपला (BJP)आता थेट विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. काँग्रेस (Congress) आणि बसपाच्या (Bsp) चौघांची फरफट होईल असे संकेत मिळत आहे, या दोघांनाही मुंबईच्या बैठकीपासून अलिप्त ठेवण्यात आले.

शनिवारी सावेडीतील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या 19 नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत अडीच वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या अन्यायाची चर्चा झाली, तसेच मुंबईत शिवसेना-राष्ट्रवादी (Shivsena-NCP) एकीचा झालेल्या निर्णयाची माहिती गटनेते संपत बारस्कर (Sampat baraskar) यांनी नगरसेवकांना दिली. मुंबईचा निर्णय म्हटल्यानंतर मान्य करावेच लागेल, असे सांगत आगामी काळात विकास कामासाठी निधी वाटपात दुजाभाव नको, अशी मागणी यावेळी पुढे आली.

याच बैठकीत उपमहापौर पदावर चर्चा झाली. पाऊलबुद्धे आणि गणेश भोसले यांनी त्यासाठी इच्छा व्यक्त केली. दोघांची नावे आ. जगताप यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. मुंबईतील बैठकीत महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर राष्ट्रवादी असा निर्णय झाल्याचे नगरसेवकांना कळविण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या