Monday, April 29, 2024
Homeनगरआगामी काळात मटका, जुगार, दारू पोलिसांच्या रडारवर

आगामी काळात मटका, जुगार, दारू पोलिसांच्या रडारवर

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पोलिस हे सामान्य माणसाच्या मदतीसाठी असतात ही भावना वाढली पाहीजे.लोकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढला पाहीजे. आगामी काळात दारु, जुगार, मटका अशा अवैध व्यावसाय पोलीसांच्या रडारवर असून त्याविरुद्ध कडक मोहीम राबवणार असल्याचे सांगत जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी अवैध व्यावसायिकांना इशारा दिला आहे.

- Advertisement -

पाथर्डी पोलिस ठाण्याच्या तपासणीसाठी आलेले जिल्हा पोलसि प्रमुख मनोज पाटील पोलसि ठाण्यात आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते. पाथर्डी पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण दाखल होण्यापुर्वी नोंद असलेल्या 1540 गुन्ह्यापैंकी 1376 गुन्ह्यांचा तपास पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी पुर्ण केला आहे. याबद्दल पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे, प्रविण पाटील,श्रीकांत डांगे,कौशल्यरामनिरंजन वाघ,उपस्थीत होते. यावेळी आदिनाथ बडे, सचिन नवगिरे, ज्ञानेश्वर रसाळ, सुहास बटुळे, विजय भिंगारदिवे,पोपट आव्हाड. मुरली लिपणे, समीर शेख, प्रल्हाद पालवे यांनी गुन्ह्याच्या तपासाचे काम उत्कृष्ठ केल्याबद्दल पोलिस पमुख मनोज पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले,पाथर्डीत येण्यासाठी कुणीही अधिकारी धजावत नव्हता. मात्र पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण व त्यांच्या टिमने अतिशय चांगले काम केले आहे. येथे पुर्वी ज्या काही अनिष्ठ सवयी लागल्या होत्या त्या बदलण्याचे काम केले आहे. येथे आणखी चांगले काम करण्याची गरज येथे आहे. पुढील सहा महीन्यात चोरट्यावर आळा घालणे, गुन्ह्याच्या तपासाचा दर्जा उंचावणे,आरोपींना तातडीने अटक करणे, अवैध व्यवसाय व गुन्हेगारी मोडुन काढणे अशी कामे पोलिस अधिकारी व कर्मचारी करतील. चांगले काम करणार्‍या अधिकारयांचा गौरव करण्याचे काम आम्ही नक्की करु असे पाटील म्हणाले. भगवान सानप यांनी आभार मानले.

अशा दुकानदारांवर कारवाई

मोहटादेवी गडावर देवीभर्क्ताला झालेल्या मारहानीच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाईल. भाविकांना कोणाचाही त्रास झाला तर तक्रारी कराआम्ही कडक कारवाई करु.भक्तांना रस्त्यामधे अडवुन पुजा साहीत्य सक्तीने देणार्‍या दुकानदारावर कारवाई केली जाईल असे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या