गणित हा यशस्वी जीवनाचा भक्कम पाया

jalgaon-digital
2 Min Read

लासलगाव । वार्ताहर Masalgaon

येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ (Vidya Prasarak Mandal) संचलित इंग्लिश मीडियम स्कूल (English Medium School) मध्ये थोर भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवासा रामानुजन (Indian mathematician Srinivasa Ramanujan) यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिनाचे (National Mathematics Day) आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात गणित विभागप्रमुख जेजूरकर (Jejurkar, Head, Department of Mathematics) यांच्या हस्ते श्रीनिवासा रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

याप्रसंगी गणितावर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा (Quiz competition), विविध गणितीय संकल्पनांचे रांगोळी रेखाटन आदी उपक्रम राबविण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना जेजूरकर यांनी गणित (Mathematics) हा यशस्वी जीवनाचा भक्कम पाया असून सुखी समाधानी जीवनासाठी आणि आयुष्याचं गणित उत्तम रित्या जमवण्यासाठी गणिता शिवाय पर्याय नाही असे मत मांडले.

यावेळी विद्यार्थी अवधूत वाघ व तेजस पोटे यांनी रामानुजन व आर्यभट यांचे उत्तम स्केच रेखाटले. इयत्ता 8 वी च्या विद्यार्थिनींनी (students) विविध गणितीय संकल्पना (Mathematical concept), चिन्हे व उपकरणे रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली. याकामी क्रीशा बर्डिया, यशस्वी ब्रम्हेचा, ऋचा बागल, रिया दरेकर, मैथिली मैंद, श्रावणी केदार, भूमिका बागल या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व आभार साक्षी मालपाणी हिने केले.

आश्मित रामगडिया व आशा जाधव यांनी गणित दिनाची माहिती दिली तर मंजू वाधवा यांनी प्रश्नमंजुषेचे संचालन केले. यावेळी प्राचार्य सत्तार शेख, उपप्राचार्या मीनल होळकर, तुकाराम केदारे, वैशाली कुलकर्णी, नुमान शेख उपस्थित होते. यावेळी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांंचा सन्मान करण्यात आला. यावेळी जेजूरकर यांनी गणित विषयावर विद्यार्थ्यांंना सविस्तर मार्गदर्शन करून गणिताबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भिती दूर केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शाळेचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *