Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमातोश्री एज्युकेशन सोसायटीत माता मेळा उत्साहात

मातोश्री एज्युकेशन सोसायटीत माता मेळा उत्साहात

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

मातोश्री एज्युकेशन सोसायटी संचालित इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज ओढाच्या प्रांगणात राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून हळदी कुंकू आणि माता मेळाव्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

- Advertisement -

संस्थेचे चेअरमन विजय कंक आणि मोनिका कंक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राजमाता जिजाऊ आणि लाला लजपत राय यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान डॉ. शीतल देशमुख होत्या. पालक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष पोलिस पाटील स्वाती कांडेकर, प्राचार्या सोनाली कानमहाले, उपप्राचार्या आरती अनवट, गायत्री कंक, उपस्थित होते.

तसेच त्यांनी माता भगिनींना मुलांची मानसिकता कशी समजावून घ्यायची, पालकत्व कसे सांभाळावे याविषयी माहिती डॉ. शीतल देशमुख यांनी दिली. ऑनलाईन शिक्षणाचे महत्त्व मोनिका कंक यांनी समजावून सांगितले. स्त्री सशक्तीकरण यावर आसावरी बोराडे या विद्यार्थिनीने सुंदर गौळण बोलली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश जाधव व प्रा. चैताली पाटील यांनी केले. कार्यक्रमात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धा, मेहंदी, उखाणे, संगीत खुर्ची, गायन, वक्तृत्व स्पर्धा यात सहभागी होउन विद्यार्थ्यांनी कलागुणांचे दर्शन घडवले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षिका आशा गावडे, पूनम कानमहाले, कल्याणी निकम यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या