Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशपाकिस्तानमधील पेशावर येथे भीषण बॉम्बस्फोट

पाकिस्तानमधील पेशावर येथे भीषण बॉम्बस्फोट

दिल्ली | Delhi

पाकिस्तानमधील पेशावर येथील दिर कॉलनीत आज भीषण स्फोट झाला आहे. मदरशात झालेल्या या स्फोटात ७ जण ठार झाले असून जवळपास ७० जखमी झाले आहेत. आज सकाळच्या सुमारास हा स्फोट झाला. यामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याची माहिती पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिली आहे.

- Advertisement -

वरिष्ठ पोलिस अधीक्षक मन्सून अमन यांनी बॉम्बस्फोटाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून स्फोटाचं कारण तसंच त्यामागे कोण होतं याची माहिती घेतली जात असल्याचं सांगितलं आहे. जखमींना जवळच्या लेडी रिंडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद आसीम यांनी सात मृतदेह आणि ७० जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. जखमींवर तात्काळ उपचार दिली जात असून रुग्णालयाचे संचालक स्वत: आपातकालीन विभागात हजर असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याशिवाय रुग्णालयात वैद्यकीय सुविधेसाठी एमर्जन्सी जाहीर करण्यात आली असल्याचं ते म्हणाले आहेत.

एलआर हॉस्पीटलचे प्रवक्ता मोहम्मद असिम यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर तातडीने उपचार सुरु आहेत. सर्व जखमींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. यासोबतच रुग्णालयाकडून आणिबाणीची घोषमा करण्यात आली आहे. म्हणजेच रुग्णालयातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बोलावण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या